देशातील सर्वच पक्ष सध्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातही निवडणुकीचे वारे वाहू लागले असून वेगवेगळ्या पक्षातील राजकीय नेते एकमेंकावर हल्लाबोल करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Eknath Shinde)
शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट हेदेखील एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान एका आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहाल टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जेव्हा मिळालं, तेव्हा शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये मिळायला हवेत, असं पत्र ठाकरेंनी आम्हाला पाठवले होते. यांना बाळासाहेबांचा विचार नको. पैसे हवे होते. मी त्यांना ५० कोटी रुपये देऊन टाकले. हे पैसे मागताना तुम्हाला जनाची नाही, तर मनाची लाज पाहिजे होती.’
(हेही वाचा – Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या किती टक्के आरक्षण आहे? किती वाढू शकते?)
अशा प्रकारे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर वेगवेगळ्या मु्द्द्यांवरून हल्ला करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर आमदारांनी ५० खोके घेऊन शिंदेंची साथ दिली, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. ठाकरे गटाच्या या आरोपामुळे ‘५० खोके एकदम ओके’, या आरोपाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही पहा –