Vidhan Bhavan : राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालक विधानभवनावर धडकणार !

संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत मध्ये मागील १२ वर्षापासून संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु शासनाने संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

221
Legislative Council Elections : महाविकास आघाडी शेकापचा गेम करणार...

विविध मागण्यासाठी राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालक विधानभवनावर (Vidhan Bhavan) धडकणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे. मुंडे म्हणाले, ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १२ वर्ष काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर तूर्तास मासिक २० हजार रुपये मानधन वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने केली आहे. (Vidhan Bhavan)

याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २१ फेब्रुवारी पासून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे २० हजार संगणकपरिचालक आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होत असून शासन जो पर्यंत मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार मुंडे यांनी व्यक्त केला. संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत मध्ये मागील १२ वर्षापासून संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु शासनाने संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. (Vidhan Bhavan)

(हेही वाचा – Bicycle Thief : मुंबईतील सायकलचोर अटकेत; २५ गुन्ह्यांची उकल)

तसेच आज महागाईच्या काळात ७००० रूपयाच्या मासिक मानधनात संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना मागील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी ११ व १२ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आश्वासनानुसार ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधाची फाईल वित्त विभागात पाठवली खरी पण त्यावर काहीही झालेले नाही, मानधन वाढीचे वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही, त्यामुळे संगणकपरिचालक शासनाच्या आश्वासनाना कंटाळला असून शासनाला जाब विचारण्यासाठी येत्या २१ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील संगणकपरिचालक हजारोंच्या संख्येने मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली. (Vidhan Bhavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.