South Mumbai Lok Sabha Constituency : देवरा राज्यसभेवर जाताच दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर जाधव यांचा डोळा

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत हे खासदार असून शिवसेनेच्या ताब्यात जरी हा मतदार संघ असला तरी भाजपने या मतदार संघावर डोळा ठेवला आहे आणि त्यानुसार त्यांनी रणनिती खेळायला सुरुवात केली आहे. हा मतदार संघ शिवसेनेचा असला तरी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपचे विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

670
South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई वरून शिवसेना, भाजपा सोबतची मनसेची संभाव्य युती तुटणार?

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईतील दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या जागेवर भाजपचा डोळा असून या मतदार संघात ऍड राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा या दोन संभाव्या उमेदवारांची नावे चर्चेत आहे. मात्र, आजवर या मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची चर्चाही नसताना आता अचानकपणे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाने उसळी घेतली आहे. त्यामुळे भाजपने डोळा ठेवलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात अप्रत्यक्षपणे शिवसेनेने दावेदारी सांगायला सुरुवात केलेली असून प्रत्यक्षात या मतदार संघात कुणाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला जातो याकडेच सर्वांचे लक्ष आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात (South Mumbai Lok Sabha Constituency) सध्या शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत हे खासदार असून शिवसेनेच्या ताब्यात जरी हा मतदार संघ असला तरी भाजपने या मतदार संघावर डोळा ठेवला आहे आणि त्यानुसार त्यांनी रणनिती खेळायला सुरुवात केली आहे. हा मतदार संघ शिवसेनेचा असला तरी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपचे विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मागील काही महिन्यांपासूनही ही चर्चा सुरु असताना शिवसेनेच्यावतीने कोणाही संभाव्या उमेदवाराचे नाव चर्चेत नव्हते की शिवसेनेच्यावतीने या मतदार संघात आपला उमेदवार असले असेही स्पष्ट केले नव्हते. (South Mumbai Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Vidhan Bhavan : राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालक विधानभवनावर धडकणार !)

शिवसेनेचा मतदार संघातील ‘हा’ दावाही पूर्णपणे संपुष्टात

परंतु आता या लोकसभा मतदार संघातून (South Mumbai Lok Sabha Constituency) माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. यशवंत जाधव चार वेळा महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या पत्नीला भायखळा विधानसभेतून निवडून आणले आहे. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी भाययखळा विधानसभेच्या आमदार असून यशवंत जाधव हे शिवसेनेत असताना उपनेते होते आणि शिवसेना फुटल्यांनतर जाधव दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या शिवसेनेतही ते नेतेपदी आहे. त्यामुळे अचानकपणे यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याने शिवसेना या मतदार संघात आपला उमेदवार उभा करणार का याबाबतच्या तर्क वितर्क लढवले जावू लागले आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

या मतदार संघात (South Mumbai Lok Sabha Constituency) यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा असली तरी प्रत्यक्षात शिवसेनेत प्रवेश केलेले या मतदार संघातील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्य सभेवर पाठवण्यात आल्याने शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याच्या आणि देवरा यांच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे. देवरा यांना राज्य सभेवर पाठवण्यात आल्याने यशवंत जाधव यांचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु हा मतदार संघ शिवसेनेचा असल्याने मिलिंद देवरा यांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या कोट्यातून राज्य सभेवर पाठवून भाजपने आपला या मतदार संघावरील दावा पक्का केला आहे. देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याने भाजपच या मतदार संघात आपला उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट असून हा मतदार संघ स्वत:कडे घेण्यासाठीच भाजपने शिवसेनेच्यावतीने देवरांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे शिवसेनेचा या मतदार संघातील हा दावाही पूर्णपणे संपुष्टात आला आहे. मात्र, या लोकसभेसाठी यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत आणून एकप्रकारे भायखळा विधानसभेची खुंटी मजबूत करून एकप्रकारे मुंबादेवी मतदार संघ आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असेल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांनी चर्चेत राहण्यासाठी लोकसभेवर दावेदारी सांगत प्रचार सुरु केला असेल असेही बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी दक्षिण मुंबईत भाजपला उमेदवारच मिळत नसल्याचे सांगत जोरदार टिका केली आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.