जेवणात खिचडी, डाळ भात अगदी रोज खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आता पांढऱ्या तांदळाचा (Lemon Rice Recipe) लेमन राईस घरच्याघरी करून बघा. हा राईस खायला अगदी रूचकर, आणि चविष्ट लागतो. विशेष म्हणजे दक्षिणेतील हा प्रसिद्ध लेमन राईस बनवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. तुम्ही तो सहज बनवू शकता.
(हेही वाचा – Puran Poli : ‘या’ टिप्स फॉलो करून बनवा खमंग, लुसलुशीत पुरणपोळी)
लेमन राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
१) २ वाट्या शिजलेला भात
२) १ वाटी उभा चिरलेला कांदा
३) कढीपत्ता
४) हिरव्या मिरच्या
५) १ चमचा हरभरा डाळ
६) १ चमचा उड़द डाळ
७) २ चमचे शेंगदाने
८) १ चमचा जिरे मोहरी
९) २ मोठे चमचे लिंबू रस
१०) मीठ
११) १/४ चमचा हिंग
१२) २ मोठे चमचे तेल (Lemon Rice Recipe)
(हेही वाचा – Matar Paneer Recipe : हॉटेलसारखे चवीचे मटर पनीर घरी कसे बनवाल? )
कृती –
१) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका आणि फोडणी द्या.
२) आता त्यात हिंग, कढीपत्ता, आले, लाल मिरची, चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. ते चांगले तळून घ्या.(Lemon Rice Recipe)
३) दाणे तडतडायला लागल्यावर शेंगदाणे, हळद सोबत तांदूळ घाला. त्यात भात मिक्स करा.
४) भातामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि ते चांगले एकजीव करा.
५) तयार आहे तुमचा लेमन राईस. गरमा-गरम सर्व्ह करा. (Lemon Rice Recipe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community