पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Jammu Visit) यांच्या २० फेब्रुवारीच्या जम्मू दौऱ्यापूर्वी शनिवारी जम्मूमध्ये ड्रोन आणि इतर हवाई उपकरणांच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित अल्ट्रा-स्मॉल विमानांच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – Crime: मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, ४८ तासांत १४ तस्करींचा पर्दाफाश)
जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश यांनी संभाव्य सुरक्षा धोक्यांशी संबंधित गुप्तचर अहवालाची दखल घेतल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १४४ अन्वये आदेश जारी केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. (PM Modi Jammu Visit)
(हेही वाचा – First Marathon 2024: अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहतूक नियंत्रण विभागाकडून अधिसूचना जारी)
२० तारखेपर्यंत कलम १४४ लागू –
ते म्हणाले की, हा आदेश २० फेब्रुवारीपर्यंत (PM Modi Jammu Visit) लागू असेल. या आदेशानुसार, (जम्मू) जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित अल्ट्रा-स्मॉल विमाने आणि पॅराग्लायडर्सच्या वापरावर बंदी घालण्यात येईल.
(हेही वाचा – Narendra Modi: भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर १०० दिवस काम करावे, पंतप्रधानांचे राष्ट्रीय अधिवेशनात आवाहन)
संरक्षण आणि निमलष्करी दलांना या निर्बंधांमधून सूट –
दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी घटकांच्या (PM Modi Jammu Visit) संभाव्य कारवायांना तोंड देण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. “संरक्षण आणि निमलष्करी दलांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community