देशात सध्या लोकसभा निवणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रही (Aaditya Thackeray) त्यात मागे नाही.
(हेही वाचा – Delhi Farmers Protest : शेतकरी आंदोलनामुळे ३ दिवसांत ३०० कोटी रुपयांचं नुकसान)
शनिवार १७ फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लालबाग येथे ‘महानिष्ठा, महान्याय, महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. तसेच राहुल गांधी यांना एक अजब सल्ला देखील दिला. “तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जा” असा उपरोधिक सल्ला दिला.
(हेही वाचा – PM Modi Jammu Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये ड्रोन आणि इतर हवाई उपकरणांच्या वापरावर तात्पुरती बंदी)
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
आपण भविष्यावर काम करणारे लोक आहोत –
लालबाग येथे आयोजित ठाकरे (Aaditya Thackeray) गटाच्या सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडलं आहे. परंतु, आपण मुंबई आणि महाराष्ट्र आहोत. आपण भविष्यावर काम करणारे लोक आहोत, सध्याचं सरकार राज्यातले उद्योग गुजरातला नेत आहे. यांच्या फक्त घोषणाच बदलतात, परिस्थिती मात्र तीच राहते. ‘अब की बार ४०० पार’ वगैरे घोषणा ते देत असतात. मात्र कामं होत नाहीत.
(हेही वाचा – Asian Badminton Championship : भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम फेरीत प्रवेश)
सगळं गुजरातला पाठवलं जातंय –
पुढे बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की; “मुंबईच्या रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला. तो सामना मुंबईत झाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता. त्यांचं (भाजपा) महाराष्ट्राच्या विकासाशी देणं घेणं नाही. सगळं गुजरातला पाठवलं जातंय.”
(हेही वाचा – Russia-Ukraine War : युक्रेन सैन्याने पाडली रशियाची लढाऊ विमाने)
राहुल गांधींना अजब सल्ला
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की; “मला भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी वाईट वाटतंय. कारण आता ज्या काही नेत्यांना पदं दिली आहेत. त्यातले बहुतेक बाहेरचे आहेत. मी तर राहुल गांधी यांना सल्ला देईन की तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर, तुम्ही भाजपात जा. कारण तिथे सर्वच काँग्रेसवाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community