शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार नेहमीच होत असते, मात्र काही शेअर असे असतात की, जे अगदी कमी कालावधीत पटकन उसळी घेऊन गुंतवणूकदारांना मालामाल करतात. एका शेअरच्या बाबतीत हेच घडले आहे.
हजूर मस्टी प्रोजेक्टस् लिमि. या कंपनीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सरकार गेल्या काही वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे या सेक्टरमध्येही तेजी आली आहे. या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअरही वाढत आहेत.
(हेही वाचा – Shivjayanti 2024 : दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार)
इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअर इस्टेट कंपनी हजूर मस्टी प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केले करोडपती केले आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरने तब्बल ३३, ६७० टक्के एवढा भरभक्कम परतावा दिला आहे. हा शेअर १ रुपयांवरून थेट ३८१ रुपयांवर पोहोचला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community