Baby Food : आपल्या लहान बाळासाठी पौष्टिक आहार शोधत आहात? तर हे नक्की वाचा

बाळ ६ महिन्याचे झाल्यावर त्याला पौष्टिक आहार देऊन धष्टपुष्ट बनवण्यावर पालकांचा भर असतो. अशातच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत एका घरगुती पौष्टिक बेबी फुड बद्दल.

191
Baby Food : आपल्या लहान बाळसाठी पौष्टिक आहार शोधत आहात? तर हे नक्की वाचा

तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहित असेलच की पहिले ६ महिने बाळ (Baby Food) हे आईच्याच दुधावर अवलंबून असते. याचे कारण म्हणजे नवजात बाळाची पचन शक्ती कमकुवत असते आणि या स्थितीत केवळ आईचेच दूध त्याला पचते. बाळ एकदा का ६ महिन्याचे झाले की तुम्ही त्याला हळूहळू इतर पदार्थ देऊ शकता.

(हेही वाचा – Vada Pav Recipe : जाणून घ्या झटपट घरगुती वडापाव बनवण्याची सोपी पद्धत)

बाळ ६ महिन्याचे झाल्यावर त्याला पौष्टिक आहार देऊन धष्टपुष्ट बनवण्यावर पालकांचा भर असतो. अशातच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत एका घरगुती पौष्टिक बेबी फुड (Baby Food) बद्दल.

साहित्य –

बेबी फूड (Baby Food) बनवण्यासाठी एक कप नाचणी, लाल तांदूळ अर्धा कप आणि ब्राऊन राईड अर्धा कप, दलिया अर्धा कप, मसूर डाळ अर्धा कप, मुग डाळ अर्धा कप, ६ बदाम, ६ काजू, ६ वेलची या एवढ्या साहित्याची गरज असते.

(हेही वाचा – Pedigree Dog Food : कुत्र्यांच्या खाद्य पदार्थांमधील घटक आणि महत्व)

कृती –

सर्वात आधी नाचणी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. तांदूळ, डाळ आणि दलिया सुद्धा एकत्र मिक्स करून पाण्याने धुवून घ्यावे. आता एक सुती कपडा घ्या आणि त्यावर नाचणी टाकून एक ते दोन तास सुकण्यासाठी सोडून द्या. डाळ, तांदूळ आणि दलियाचे मिश्रण सुद्धा अशाच प्रकारे सुकवून घ्या. नाचणी सुकल्यावर एका भांड्यात पाच मिनिटे ती भाजून घ्या. दुसरे मिश्रण (Baby Food) सुद्धा याच प्रकारे भाजून घ्या. त्यानंतर भांड्यात काजू, बदाम आणि वेलची टाकून भाजून घ्या. या तिन्ही गोष्टी मिक्स करा आणि १५ मिनिटे थंड होऊ द्या. आता हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्या. आता ही पावडर वेगळी काढून एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.

(हेही वाचा – Food Of Andaman And Nicobar Islands: अंदमान-निकोबर बेटांवरील पाककला संस्कृती !)

त्यानंतर रोज एका छोट्या भांड्यात दोन चमचे पावडर घेऊन त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून चांगलं एकजीव करा. त्यात गुठल्या होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. नंतर हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्यावे. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात तूप घालावे. तसेच तुम्ही फ्लेवर साठी मॅश केलेली केळी, खजूराचे सिरप किंवा वाटून घेतलेला गुळ टाकू शकता. (Baby Food)

हे बेबी फूड (Baby Food) प्रोटीनने भरलेले आहे जे बाळच्या विकासात मदत करते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.