Solar Rooftop Yojana : आता वीजबिलात होणार बचत; घ्या सरकारच्या ‘या’ योजनेचा फायदा

Solar Rooftop Yojana : महावितरणसाठी 25 मेगा वॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलो वॉट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साहाय्य देण्यात येणार आहे.

487
Solar Rooftop Yojana : आता वीजबिलात होणार बचत; घ्या सरकारच्या 'या' योजनेचा फायदा
Solar Rooftop Yojana : आता वीजबिलात होणार बचत; घ्या सरकारच्या 'या' योजनेचा फायदा

महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. (Solar Rooftop Yojana)

महावितरणसाठी (MahaVitaran) 25 मेगा वॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलो वॉट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साहाय्य देण्यात येणार आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात बचत होणार आहे. नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षअखेर शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाणार आहे.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसणार; मनीष तिवारी भाजपच्या वाटेवर)

सोलर रुफटॉप योजनेचे उद्देश
  • गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान
  • साधारणतः 3 ते 5 वर्षांत परतफेड परतफेडीची संधी
  • यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी बचत होणार
  • घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना होणार लाभ
  • सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा (Solar Power Generation System) कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलो वॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल
  • या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल.
सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी वित्त साहाय्य
  • घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो वॉटपर्यंत 40 टक्के
  • 3 किलो वॉटपेक्षा अधिक ते 10 किलो वॉटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे
  • सामूहिक वापरासाठी 500 किलो वॅटपर्यंत
  • प्रत्येक घरासाठी 10 किलो वॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान

(हेही वाचा – Ramakrishna Paramhansa: काली मातेने दर्शन नाही दिले तर मी प्राणत्याग करेन, असं जेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, तेव्हा काय घडलं?  )

हा आहे तपशील
  • पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेसाठी 1 किलो वॉट- 46,820, 1 ते 2 किलो वॉट- 42,470, 2 ते 3 किलो वॉट- 41,380, 3 ते 10 किलो वॉट- 40,290, तसेच 10 ते 100 किलोवॉटसाठी 37,020 रुपये प्रति किलो वॉट किंमत जाहीर करण्यात आली आहे.
  • उदा. या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची 1 लाख 24 हजार 140 रुपये किंमत राहील. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल. संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.
  • रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा (Rooftop solar power generation system) कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकाकडील एक किलो वॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल.
  • या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रति युनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदासंबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौरयंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. (Solar Rooftop Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.