Chhatrapati Shivaji Maharaj : सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी – असं कोण म्हणालं होतं?

आग्र्यावर स्वारी करुन तिथून ज्याप्रकारे त्यांनी सुटका करुन घेतली, त्यास तोड नाही. छत्रपतींची प्रत्येक मोहीम ही इतिहासाच्या पुस्तकात अभ्यासासाठी ठेवली पाहिजे. इतकंच काय तर भारत सरकारने इतर देशांना सुद्धा अफझलखान वध आणि आग्र्याहून सुटका या दोन गोष्टी युद्धशास्त्रातील अभ्यास म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव दिला पाहिजे.

541
Chhatrapati Shivaji Maharaj : सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी - असं कोण म्हणालं होतं?

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याच्या तोंडून आपसुकच जय निघतं तोच हिंदू असतो. छत्रपतींनी आधी जो पराक्रम केला, त्या पराक्रमाच्या बळावर हिंदुस्थान तग धरुन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म पुण्यातील जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. (Chhatrapati Shivaji Maharaj)

त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे महान योद्धा होते आणि आई जीजाबाई ह्या देखील योद्धा होत्या. १६ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) तोरणा किल्ला जिंकला. त्यानंतर पुरंदर, कोंढाणा आणि चाकणचा किल्लाही त्यांनी जिंकला. शाहिस्तेखानाची बोटे छाटली तेव्हा मुघल साम्राज्य हललं होतं आणि अफझलखानासारख्या राक्षसाचा वध केल्यानंतर तर त्यांची किर्ती जगभरात पसरली. (Chhatrapati Shivaji Maharaj)

(हेही वाचा – Manoj Jarange : जरांगे आपल्या मागणीवर ठाम, २१ फेब्रुवारीला ठरणार आंदोलनाची दिशा)

आग्र्यावर स्वारी करुन तिथून ज्याप्रकारे त्यांनी सुटका करुन घेतली, त्यास तोड नाही. छत्रपतींची (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रत्येक मोहीम ही इतिहासाच्या पुस्तकात अभ्यासासाठी ठेवली पाहिजे. इतकंच काय तर भारत सरकारने इतर देशांना सुद्धा अफझलखान वध आणि आग्र्याहून सुटका या दोन गोष्टी युद्धशास्त्रातील अभ्यास म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव दिला पाहिजे. जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या या हिंदू राजाची किर्ती जगभरात पसरेल. (Chhatrapati Shivaji Maharaj)

आपण जातीजातीत, प्रांताप्रांतात भांडत बसलो. मात्र त्यांचा सिकंदर हा जगज्जेता म्हणून नावारुपाला आला. सिकंदराला भारत जिंकता आला नाही, मग तो जगज्जेता कसा असू शकेल हा प्रश्न आपल्याला पडला नाही. आपणही त्यांच्या सूरात सूर मिसळून, ’जो जिता वही सिकंदर’ म्हणत राहिलो. पण शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) विसरलो. यापुढे आपल्याला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. आपला इतिहास लोकांसमोर कसा ठेवायचा याची स्पष्टता आपल्याला असायला हवी. शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) ’हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख शासन दरबारी झाला पाहिजे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि महत्व कवी भूषण यांनी सांगून ठेवलं आहे. कवी भूषण म्हणतात,

“काशी की कला जाती
मथुरा की मस्जिद होती
सिवाजी न होते तो,
सुन्नत होती सबकी”

हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवलं पाहिजे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.