- ऋजुता लुकतुके
यामाही कंपनीची वायझेडएफ आर७ (Yamaha YZF-R7) ही बाईक जगभरात सुपरस्पोर्ट बाईक म्हणूनच ओळखली जाते. तब्बल १७ लीटरची पेट्रोलची टाकी असलेली ही बाईक आता भारतीय बाजारपेठेत दमदार प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच भारतातील ग्लोबल एक्स्पो कंपनीने लोकांसमोर पहिल्यांदा ही बाईक आणली होती. आणि त्यानंतर कंपनीच्या चेन्नई मधील विशेष ट्रॅकवर तिचं टेस्टिंगही सुरू झालं आहे. त्यामुळे लवकरच ती भारतीय बाजारपेठेत येईल असं बोललं जात आहे. ऑक्टोबर २०२४ अशी या बाईकची लाँचची वेळ असल्याचीही चर्चा आहे. (Yamaha YZF-R7)
युरोपीयन आणि चिनी बाजारात यामाहा वायझेडएप आर७ ही बाईक आधीपासून पाय रोवून आहे. आणि तेथील बाईकचं डिझाईन आणि फिचर बघून भारतातील मॉडेलचा अंदाज आपण बांधू शकतो. ही बाईक मध्यम वजनाच्या श्रेणीतील स्पोर्ट बाईक आहे. गाडीला एकच मोठा हेडलाईट आहे. आणि हँडलबार क्लिप-ऑन पद्धतीचा आहे. आयकॉन ब्लू आणि यामाहा काळा या रंगात ही बाईक सध्या उपलब्ध आहे. (Yamaha YZF-R7)
#2024 #yamaha YZF-R7 Launched overseas with new colour shades🔥..do you think this new model should Launch in India??
.
.@autotechlite 🇮🇳 for more amazing daily posts follow our page
.
.#yamahayzfr7 #r7 #yzfr7 #yamahar7 #yamahalovers❤ #yamahalovers #yamahalove #yamahafamily pic.twitter.com/vucDIW5o2O— Autotechlite (@autotechlite) December 30, 2023
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवरुन केली मोठी घोषणा)
गाडीची किंमत १० लाख रुपयांपासून सुरू
गाडीचं इंजिन ६८७ सीसी क्षमतेचं आहे. आणि यात ट्विन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. तर लिक्विड कूल्ड सीपी२ प्रकारचं इंजिन यात आहे. गाडीत सहा स्पीडचा गिअरबॉक्स आहे. ७२.४ बीएचपी इतकी शक्ती या इंजिनातून निर्माण होते. गाडीचे दिवे एलईडी प्रकारचे आहेत. आणि मधला डिस्प्ले हा एलसीडी आहे. गाडीत सुरक्षेसाठी क्विक शिफ्ट यंत्रणा तसंच एबीएस प्रणालीही आहे. (Yamaha YZF-R7)
जागतिक बाजारातील किंमत पाहता भारतात या गाडीची किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. भारतात या गाडीला स्पर्धा असेल ती होंडा सीबीआर६५० आर आणि कावासाकी निंजा ६५० या गाड्यांकडून. (Yamaha YZF-R7)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community