चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील (Chandigarh Mayor Resign) वादाला नवे वळण लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच रविवार १८ फेब्रुवारी रोजी भाजपाचे महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला. दरम्यान, आपच्या तीन नगरसेवकांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवरुन केली मोठी घोषणा)
महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान मतपत्रिकेशी छेडछाड झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३० जानेवारी रोजी ते महापौर म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निवडीवरून बराच वाद झाला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सोमवारी (१९ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे तत्पूर्वी रविवारी रात्री महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष जे. पी. मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. (Chandigarh Mayor Resign)
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याला फटकारले –
आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापौरपदाची निवडणूक घेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला फटकारले होते, त्यांनी मतपत्रिकेशी छेडछाड केल्याचे स्पष्ट आहे आणि त्यांच्यावर खटला चालवला जावा असे म्हटले होते. अधिकाऱ्याची कृती ही लोकशाहीची ‘हत्या आणि थट्टा’ असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. (Chandigarh Mayor Resign)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार)
भाजपकडे १४ ऐवजी १७ आमदार –
आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) रात्रीपासून शहराबाहेर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी त्यांच्याशी चर्चा केली. एका नगरसेवकाने सांगितले की तो लग्न करणार आहे, तर दुसऱ्या नगरसेवकाने स्पष्टपणे सांगितले की तो पक्षावर नाखूष आहे. मात्र, शनिवारी त्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले. ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. आता भाजपकडे १४ ऐवजी १७ नगरसेवक आहेत. (Chandigarh Mayor Resign)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवरुन केली मोठी घोषणा)
हे तिघेही आता भाजपात दाखल झाले आहेत.
आम आदमी पार्टीच्या चंदीगडमधील पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरुचरण काला या तीन नगरसेवकांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे या तिघांचेही म्हणणे आहे. नेहा मुसावतने असेही म्हटले की, आम्हाला खोटी आश्वासने देण्यात आली होती. (Chandigarh Mayor Resign)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community