Asian Badminton Championship : भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत थायलंडचा ३-२ असा पराभव केला. 

196
Asian Badminton Championship : भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

मलेशियात सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत विजेतेपद पटकावताना भारताने बलाढ्य चीन आणि थायलंडला धूळ चारली. पी व्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अनपेक्षित यश मिळवताना सांघिक स्पर्धेतही भारतीय महिला संघ कमी नसल्याचं दाखवून दिलं. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या युवा खेळाडूंनी संघाला हा विजय मिळवून दिला आहे. (Asian Badminton Championship)

थायलंडच्या संघात रॅचनन इथॅनन आणि पोर्नपोवी चेचूनांग या आघाडीच्या खेळाडू खेळत नव्हत्या. त्यामुळे थायलंडचा संघ पूर्ण क्षमतेनं खेळत नव्हता. पण, भारताच्या युवा खेळाडूंच्या विजयाचं मोल त्यामुळे कमी होत नाही. अंतिम फेरीत भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला. (Asian Badminton Championship)

२ वेळा ऑलिम्पिक पदक पटकावलेल्या पी व्ही सिंधूने सुपनिदा केथाँगचा २१-१२, २१-१२ असा पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर गायत्री आणि त्रिसा या दुहेरी जोडीने जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या कितिथारकुल आणि जाँगजाई या जोडीचा २१-१६, १८-२१ आणि २१-१६ असा पराभव केला. त्रिसा आणि गायत्री या जोडीने आपल्या खेळाने या स्पर्धेत छाप पाडली आहे. दोघींनी भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. (Asian Badminton Championship)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : राजकोट कसोटी जिंकून भारताच्या नावावर जमा झाले ‘हे’ विक्रम)

त्यानंतर अश्मिता चलिहा आणि श्रुती, प्रिया या दुहेरीच्या दुसऱ्या जोडीने आपापले सामने गमावल्यामुळे थायलंडने २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे नजर पुन्हा एकदा १७ वर्षीय अनमोल खरबवरच होती. (Asian Badminton Championship)

उपान्त्य लढतीतही तिनेच शेवटच्या विजयाची जबाबदारी उचलली होती. आताही तिने जागतिक क्रमवारीत ४५ व्या क्रमांकावर असलेल्या पॉर्नपिचा चायकीवाँगचा २१-१४ आणि २१-९ असा पराभव केला. अनमोलच्या या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी कोर्टवर धाव घेत तिच्या भोवती कडं केलं आणि तिला उचलून धरलं. भारतीय महिलांचं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील हे पहिलंच पदक आहे. तर पुरुषांनी २०१६ आणि २०२० मध्ये कांस्य पदकं जिंकली आहेत. (Asian Badminton Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.