मराठा आरक्षणासाठी मंगळवार, १९ फेब्रुवारी रोजी राज्याच्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी, शिवनेरी किल्ल्यावर याविषयी बोलताना या अधिवेशनात मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर टीका केली आहे. या अधिवेशनातून काहीही सध्या होणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
मराठा आरक्षणाचा विषय हा मुळात केंद्राचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा आहे. राज्यात यावर काहीही होऊ शकत नाही. इथे विशेष अधिवेशन घेऊन काही सध्या होणार नाही. केवळ झुलवण्याचा प्रकार आहे. आपण याआधीही हे सांगितले आहे. त्यामुळे उद्याच्या अधिवेशातून काही निष्पन्न होणार नाही, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मंगळवारी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्याआधी राज्यभर मराठा समाजाचे सर्वेक्षण राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून करण्यात आले. आयोगानाने त्यांचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. आयोगाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.
Join Our WhatsApp Community