Bangladeshi Held in Panvel : बांगलादेशी अस्लम बनला रंजन दास; एटीएसने केला भांडाफोड

Bangladeshi Held in Panvel : रंजन सत्यरंजन दास उर्फ ​​अस्लम अब्दुल कुद्दूस शेख (३५) आणि मलिना रंजन दास उर्फ ​​हुस्ना अस्लम शेख (३४) असे अटक करण्यात आलेल्या या संशयित दांपत्याची नावे असून हे दोघे मूळचे बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील नागरिक आहेत.

418
Bangladeshi Held in Panvel : बांगलादेशी अस्लम बनला रंजन दास; एटीएसने केला भांडाफोड
Bangladeshi Held in Panvel : बांगलादेशी अस्लम बनला रंजन दास; एटीएसने केला भांडाफोड

हिंदू नावाने वावरणाऱ्या बांगलादेशी मुसलमान जोडप्याला पनवेल शहरातून अटक करण्यात आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस, ATS) नुकतीच ही कारवाई केली केली आहे. या बांगलादेशी मुसलमान घुसखोरांनी हिंदू नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे, शिधापत्रिकाही बनवून घेतली आहेत. (Bangladeshi Held in Panvel)

दहशतवाद्यांच्या कनेक्शनचा तपास सुरु

या बनावट कागदपत्रांसह अन्यही कागदपत्रे त्यांच्या घराच्या झडतीत जप्त करण्यात आली आहेत. बनावट कागदपत्रे घेऊन सरकारची फसवणूक करण्याचा त्यांचा उद्देश अद्याप समोर आलेला नसला, तरी त्यांचे कनेक्शन कुठल्या दहशतवादी संघटनेशी आहे का, या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

(हेही वाचा – Lemon Tree Hotel Mumbai : लेमन ट्री हे मुंबईतील एक आलिशान हॉटेल)

संशयास्पद हालचालींवरून अटक  

रंजन सत्यरंजन दास उर्फ ​​अस्लम अब्दुल कुद्दूस शेख (३५) आणि मलिना रंजन दास उर्फ ​​हुस्ना अस्लम शेख (३४) असे अटक करण्यात आलेल्या या संशयित दांपत्याची नावे असून हे दोघे मूळचे बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील नागरिक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथक (Anti Terrorism Squad) नवी मुंबई युनिटला या दाम्पत्याची माहिती मिळाली होती. हे घुसखोर मागील ४ वर्षांपासून संशयास्पदरित्या पनवेल शहरातील एका भागात रहात होते, एटीएसच्या पथकाने २ दिवसांपूर्वी या दांपत्यावर पाळत ठेवून त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून दोघांना ताब्यात घेतले.

मुसलमान असूनही बनावट कागदपत्रांवर हिंदू नाव

या दोघांकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी प्रथम ते हिंदू असल्याचे सांगून त्यांची नावे रंजन सत्यरंजन दास आणि मलिना रंजन दास असे सांगून ते मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे सांगितले. एटीएसने त्यांची कागदपत्रे तपासली असता त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, वाहन परवाना आणि मतदार ओळखपत्र यांच्यावर हिंदू नावे आढळून आली. याबाबत एटीएसने अधिक चौकशी केली असता ही कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले. एटीएसने या दांपत्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

(हेही वाचा – Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले)

इंटरनेटवरून बांगलादेशातील नागरिकांच्या संपर्कात

अधिक चौकशीत यांची खरी नावे अब्दुल कुद्दूस शेख आणि हुस्ना अब्दुल शेख अशी असल्याचे आढळून आले. हे दोघे मूळचे बांगलादेशी नागरिक असून मागील ४ वर्षांपासून पनवेल येथे बेकायदेशीररित्या रहात होते. २०१६ मध्ये अब्दुल शेख हुस्नाच्या संपर्कात आला, जो मूळचा बांगलादेशातील नोडेल जिल्ह्यातील आहे. शेख आणि हुस्ना यांनी त्याच वर्षी लग्न केले. या जोडप्याने आपली खरी ओळख लपविण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक, मतदार ओळखपत्र आणि शिधापत्रिका बोगस नावांवर तयार करून घेतली होती. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी हे इंटरनेट कॉलिंग मोबाईल ऍप्लिकेशन वापरून बांगलादेशातील नागरिकांच्या संपर्कात होते. हे दोघे नक्की कुणाच्या संपर्कात होते, दोघांचा हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

या दोघांकडे सापडलेल्या बोगस दस्तावेज प्रकरणी एटीएसने भारतीय दंड संहिता कलम ३४ (सामान्य हेतूने अनेकांनी केलेली कृत्ये), ४२०(फसवणूक), ४६५ (बनावट दस्तावेज), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज) आणि ४७१ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bangladeshi Held in Panvel)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.