IPL All Time Great Team : आयपीएलच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी

आयपीएल लीगच यश साजरं करण्यसाठी यंदा सर्वकालीन सर्वोत्तम संघ निवडण्यात आला आहे. 

254
  • ऋजुता लुकतुके

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेला आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या लीगचं यश साजरं करण्यासाठी हा संघ निवडण्यात आला आहे. डेल स्टेन, वसिम अक्रम, टॉम मूडी आणि मॅथ्यू हेडन हे माजी क्रिकेटपटू तसंच ७० पत्रकारांनी हा संघ निवडला आहे. आणि सर्वानुमते धोनीची कर्णधारपदी निवड झाली आहे. (IPL All Time Great Team)

या संघाची सलामीची जोडी असेल ती ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा विराट कोहली. टी-२० चा जागतिक ब्रँड अँबेसिडर असलेला ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज असेल. सुरेश रैना, एबी डिव्हिलिअर्स, सूर्यकुमार यादव आणि महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) अशी या संघाची मधळी फळी असेल. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कायरन पोलार्ड हे तीन अष्टपैलू खेळाडू असतील. रशिद खान, सुनील नरेन आणि यजुवेंद्र चहल हे फिरकी गोलंदाज तर जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा या संघातील तेज गोलंदाज. (IPL All Time Great Team)

(हेही वाचा – Hotels Near Gateway of India : मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसराला भेट द्यायची आहे ? ‘ही’ आहेत लक्झरी हॉटेल्स)

रोहित शर्माचा या संघात समावेश नाही

आयपीएल लीगला १६ वर्ष पूर्ण होत आहेत. ‘आयपीएल क्रिकेटच्या जगतात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा चमकणारा तारा आहे. त्याच्या सारखे मोजके क्रिकेटपटू असतील ज्यांनी आपला अजरामर ठसा उमटवला आहे. बरोबरचे खेळाडू आणि क्रिकेटमधील जाणकार सगळ्यांनीच धोनीला पाठिंबा दिला आहे. आणि मैदानावरील त्याचं यश तर वादातीत आहे,’ या शब्दांत निवड समितीतील एक खेळाडू डेल स्टेनने आपलं मनोगत व्यक्त केलं. (IPL All Time Great Team)

‘धोनीने आयपीएल, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक अशा सगळ्या स्पर्धा भारताला जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे तोच आयपीएलच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघाचं नेतृत्व करण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं एकमताने ठरलं,’ असं ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन म्हणाला. हिटमॅन रोहित शर्माचा या संघात समावेश नाहीए. (IPL All Time Great Team)

आयपीएलचा सर्वकालीन सर्वोत्तम संघ पुढील प्रमाणे,

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, सुरेश रैना, एबी डिव्हिलिअर्स, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, रशिद खान, सुनील नरेन, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा व लसिथ मलिंगा. (IPL All Time Great Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.