Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींना मोठे आश्वासन; म्हणाले…

Devendra Fadnavis : शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले. मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूचा निःपात केला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असे देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.

226
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींना मोठे आश्वासन; म्हणाले...
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींना मोठे आश्वासन; म्हणाले...

राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून अडचणी येतात. या अडचणींविषयी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी पुरातत्व खात्याची (Archaeological Survey of India) प्रमाणित कार्यपद्धत सोपी करण्याबाबत आश्वासन दिले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उद्गार उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले. ते जुन्नर येथे किल्ले शिवनेरी येथील शिवजयंती (Shivjayanti 2024) उत्सवात बोलत होते.

(हेही वाचा – Most Powerful Passport 2024 : फ्रान्सचा पासपोर्ट सगळ्यात तगडा, काय आहे भारताचा नंबर?)

प्रत्येक विभागीय मुख्यालयात शिवसृष्टी स्थापन करणार

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्यभिषेक करून स्वराज्य स्थापन केले. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारतभूमीत होतच राहील. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयात शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल.

माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्राचे रोपण केले. मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूचा निःपात केला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.