Dharavi redevelopment project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत खासदार राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले…

1661
Dharavi redevelopment project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत खासदार राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले…
Dharavi redevelopment project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत खासदार राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी,मुंबई

देशातील सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi redevelopment project) रखडवण्याचा विरोधकांचा डाव असून त्यासाठी विविध प्रकारचा अपप्रचार करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. मात्र, धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi redevelopment project) यशस्वीरीत्या मार्गी लावण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द असून धारावीकरांना अपेक्षित असलेल्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात होणार आहे, असेही खासदार शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे बोलत होते. संक्रमण शिबिर, पर्यावरण,  ५०० स्क्वेअर फुटांचे घर अशा विविध विषयांवर अपप्रचार करून धारावीतील जनतेला पुनर्विकास प्रक्रियेपासून दूर नेण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा थेट आरोप शेवाळे (Rahul Shewale)  यांनी केला.

(हेही वाचा- Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटनाला चालना, एक्सप्रेस वे २०२८पर्यंत पूर्ण )

प्रकल्प लांबणीवर नेण्यासाठी हा विरोध :

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुंबईतील मिठागराची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पातील(Dharavi redevelopment project)  अपात्र रहिवाशांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय हा मुंबईच्या पर्यावरणासाठी धोकादायक आहे, असा आरोप विरोधक आणि काही पर्यावरणवाद्यांनी केला होता. मात्र,  २०१८ साली मंजूर झालेल्या मुंबई विकास आराखडा २०३४  (DP 2034) नुसार मिठागरांची ही जागा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील नसून यावर बांधकाम करण्यासाठी यापूर्वीच परवानग्या देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीनेही इथे परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प राबविला जात आहे. आणि मुख्य म्हणजे विकास आराखडा हा सन  २०१८ मध्ये म्हणजे तत्कालीन शिवसेना – भाजपा सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विरोध करणाऱ्यांनी तेव्हा या गोष्टीला का विरोध केला नाही? की आता केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्प लांबणीवर नेण्यासाठी हा विरोध सुरू आहे? असा सवाल खासदार शेवाळे (Rahul Shewale)यांनी केला आहे.

पर्यावरण विषयक आरोपात काहीही तथ्य नाही :

ह्या सर्व मिठागराच्या जमिनी या पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिम बाजूस आहेत आणि या भागात कोणतेही सीआरझेड निर्बंध, पाणथळ जागा अथवा खारफुटी चे जंगल नाही.तसेच, वडाळा येथील मिठागराच्या जागेवर केंद्र सरकारच्या कस्टम विभागाकडून त्यांच्या कार्यालय आणि कर्मचारी वसाहतीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण विषयक आरोपात काहीही तथ्य नाही.(Dharavi redevelopment project)

(हेही वाचा- Abu Dhabi Temple : इस्लामिक देशात हिंदु मंदिराची उभारणी, वैश्विक हिंदु राष्ट्र निर्मितीची नांदी; सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ यांचे उद्गार )

कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका :

लवकरच धारावीत घरांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (Dharavi redevelopment project) रहिवाशांची आणि इथल्या घरांची नेमकी माहिती गोळा होईल आणि पुनर्विकास प्रक्रियेला वेग येऊ शकेल.  त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता धारावीतील जनतेने या सर्वेक्षणाला सहाय्य करावे, असे आवाहनही खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केले.

नवीन मातोश्रीचा परिसरही खारफुटी आणि दलदलीचा :

मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय किंवा मेट्रो करशेड साठी खारफुटीच्या जमिनीची मागणी  देखील माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याच कार्यकाळात करण्यात आले होती. तसेच मातोश्री ज्या ठिकाणी बांधण्यात आली तो परिसर देखील खारफुटी आणि दलदलीचा होता. तेव्हा पर्यावरणाचा विचार आला नाही. त्यामुळे केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (Dharavi redevelopment project)  विरोध करण्यासाठीच उद्धव ठाकरे हा अपप्रचार करत असल्याचा टोलाही खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी लगावला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.