Thane Traffic Police: मुंब्रा वाहतूक विभागावर आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राईक

319
Thane Traffic Police: मुंब्रा वाहतूक विभागावर आयुक्ताचा सर्जिकल स्ट्राईक
Thane Traffic Police: मुंब्रा वाहतूक विभागावर आयुक्ताचा सर्जिकल स्ट्राईक

ठाणे वाहतूक पोलिस विभागातील (Thane Traffic Police) सर्वात क्रिम पोस्टिंग (Cream Posting) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा वाहतूक विभागावर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Police Commissioner of Thane Ashutosh Dumbre) यांनी सर्जिकल स्ट्राईक (surgical Strike) केला.एकाच वेळी या विभागातील पोलीस अधिकाऱ्यासह ४० जणांची येथून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात ( Transfer Of 40 Police Officers in Control Room) टाकण्यात आले. या सर्जिकल स्ट्राईकला कारण म्हणजे एक व्हिडिओ ठरला आहे, या व्हिडीओ मधून मुंब्रा वाहतूक विभागाचा (Mumbra Traffic Division) भ्रष्टाचार (corruption) समोर आला आणि आयुक्तांना मोठे पाऊल उचलावे लागले.

वर्षानुवर्षे सुरू होती वसुली…
नवीमुंबई, न्हावाशेवा, उरण तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात जाणारी मालवाहतूक मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास (Mumbra Bypass) येथून जाते, दररोज हजारोंच्या संख्येने मालवाहतूक करणारे अवजड वाहने ( Heavy Vehicles)या मार्गावरून ये-जा करीत असतात. मुंब्रा बायपासवर पूर्वी टोलनका (Toll plaza) होता, अनेक वर्षांपूर्वी हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. टोलनाका बंद होऊन देखील या ठिकाणी अनेक वर्षे बेकायदेशीरपणे टोल वसुली( illegal Toll)केली जात होती. या टोल वसुलीसाठी मुंब्रा येथील टोळ्या कार्यरत होत्या, या टोळ्या दिवसा आणि रात्रीच्या सुमारास अवजड वाहने, शहराच्या बाहेरील वाहन चालकाकडून बेकायदेशीर टोल वसुली करीत होती. या टोल नाक्यावर दररोज लाखो रुपयांची बेकायदेशीर टोल वसुली केली जात होती. या टोळ धाडीला स्थानिक पोलीस आणि राजकारण्यांचा पाठींबा होता, कारण त्यांना त्यातील काही हिस्सा मिळत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली.

टोल वसुली बंद वाहतूक पोलीस वसुली सुरू …
काही वर्षे सुरू असलेली बेकायदेशीर टोल वसुली बंद झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक विभागाने आपली वसुली सुरू केली होती.मुंब्र्यातील रिकामटेकड्या टोळक्याना घेऊन वाहतूक विभागाचे ७ ते ८ पोलीस शिपाई मुंब्रा बायपास (Mumbra Bypass)येथे अवजड वाहनांना थांबवून प्रत्येक ट्रक तसेच वाहन चालकाकडून कारवाईच्या नावाखाली वसुली सुरू केली होती. वाहतूक पोलिसांची राजरोसपणे ही वसुली मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक वॉर्डन (Traffic Warden) यांना देखील वसुलीच्या कामासाठी लावले होते. दररोज लाखो रुपयांची वसुली मुंब्रा बायपास येथे सुरू होती. मुंब्रा बायपासवर पोस्टिंगसाठी पोलीस शिपाई वरिष्ठांना मोठी रक्कम अदा करीत होते अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. या बेकायदेशीर वसुलीला ना कुणाचा धाक होता ना कोणी रोखू शकत होते.अनेक वेळा या ठिकाणच्या तक्रारी देखील करण्यात आल्या तेवढ्या पुरते कारवाई होऊन काही दिवसांनी पुन्हा वसुली सुरू होत होती.

व्हायरल व्हिडिओने केली पोलखोल …
अखेर या बेकायदेशीर वसुलीला एका व्हिडीओ मुळे चाप बसला, मुंब्रा बायपास (Mumbra Bypass)वर अवजड वाहन चालकाकडून वसुली करणाऱ्या एका ट्रॅफिक वॉर्डन आणि मुंब्रा वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला व हा व्हिडीओ ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Police Commissioner of Thane Ashutosh Dumbre) यांच्यापर्यत येऊन ठेपल्यानंतर या व्हिडीओची चौकशीचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड (Thane Traffic division Dcp Dr.Vinaykumar Rathod )यांच्याकडे देण्यात आले. चौकशीअंती मुंब्रा वाहतूक विभागातील एकाच वेळी ४० जणांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. (40 Traffic police transfer) या मध्ये मुंब्रा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचासह काही अधिकारी यांचा समावेश आहे.शनिवारी या बदलीचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले. ठाणे पोलीस आयुक्तांच्या या सर्जिकल स्ट्राईक मुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडवून दिली असून पोलीस आयुक्तलयात या बदलीची चर्चा रंगली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.