रणथंभौर नॅशनल पार्क, राजस्थान रणथंभौर राष्ट्रीय अभयारण्य वाघांमुळे जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्याला 1981 मध्ये राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. येथे वाघ आणि चित्ते मोठ्या प्रमाणावर बघण्यास मिळतात तसेच येथे चिंकारा, जंगली मांजर आणि पक्ष्यांच्या 200 पेक्षा अधिक प्रजाती बघायला मिळतात.
जिम कार्बोट नॅशनल पार्क हे पार्क रामगंगा नदीकिनारी वसलेले आहे. उत्तराखंडच्या नैनिताल जवळ असलेले हे पार्क हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. पहिले अभयारण्य रामगंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जायचे, पण 1957 मध्ये याचे नाव बदलून कॉर्बोट नॅशनल पार्क असे करण्यात आले. या अभयारण्यात वाघ, चित्ता, माकडे, हरिण, हत्ती यांसारखे प्राणी अगदी जवळून बघू शकता.
बाधवगढ राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश 1968 मध्ये हे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान जगभरात येथे असणा-या वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पांढ-या रंगाचा चित्ता याच उद्यानात सापडला होता. या उद्यानात वाघांशिवाय निलगाय,चिंकारा असे प्राणीदेखील बघायला मिळतील. येथे तुम्ही हत्तीची सवारी अथवा गाडीतून फिरू शकता.
पेरिअर नॅशनल पार्क, केरळ वाघांसाठी हे उद्यान आरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पेरिअर नदीजवळ वसलेले हे उद्यान 1040 एवढ्या मोठ्या क्षेत्रात पसरलेले आहे. 1998 मध्ये हे 'हत्ती संरक्षित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
5. काझिरंगा नॅशनल पार्क, आसाम - येथे असनारे एकशिगी गेडे हे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत. आसाममधील हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 430 किमी मध्ये विस्तारलेले आहे. हिवाळ्यात येथे विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.