IT Companies in Pune : या आहेत पुण्यातील आघाडीच्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्या

जाणून घेऊया पुण्यातील आघाडीच्या ५ टेक कंपन्यांविषयी. 

300
IT Companies in Pune : या आहेत पुण्यातील आघाडीच्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्या
  • ऋजुता लुकतुके

पुणे हे पश्चिम भारतातील एक विस्तीर्ण शहर आहे. आणि टेक कंपन्यांच्या बाबतीत तर बंगळुरूच्या खालोखाल याच शहराचा क्रमांक लागतो. हे क्षेत्र अजूनही विस्तारतंय. आणि या घडीला एकट्या पुण्यात जवळ जवळ ५० लाख लोक या क्षेत्रात कामाला आहेत. भारतातील टीसीएस, इन्फोसिस असा दिग्गज टेक कंपन्यांची कार्यालयं तर इथं आहेतच. शिवाय बदलत्या आयटी चित्रानुसार आता टेक सेवा देणाऱ्याच नाही तर हेल्थटेक, फिनटेक आणि उत्पादन क्षेत्राला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या कंपन्याही इथं उदयाला आल्या आहेत. (IT Companies in Pune)

नेहमीच्या दिग्गज टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, एल अँड टी अशा नावाजलेल्या कंपन्यांच्या खालोखाल पण, जागतिक विस्तार असलेल्या पुण्यातील आघाडीच्या कंपन्या आज पाहूया, (IT Companies in Pune)

ईडीबी सॉफ्टवेअर सपोर्ट

डेटाबेस व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्यांना ही कंपनी तांत्रिक मदत करते. त्यांची उत्पादनं पोस्टग्रे एसक्यूएल वर आधारित आहेत. कंपनीला कंपनीचा पोस्टग्रे डेटाबेस घेऊन त्यावर काम करते. आणि त्यातून कंपनीची उत्पादकता जास्तीत जास्त कशी वाढेल यावर कंपनीला मदत करते. उत्पादनाची साखळी तुटू नये यावर कंपनी खास करून लक्ष देते. त्यासाठी कंपनीने तांत्रिक मदत देऊ केली आहे. पुणे इथं या जागतिक कंपनीची मोठी शाखा आहे. (IT Companies in Pune)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?)

ॲक्विया

द्रुपाल या वेबसाईटच्या मागे लागणारी वेब यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीला ॲक्विया मदत करते. मूळात द्रुपाल ही ऑनलाईन मजकूर व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. आणि त्यात ॲक्विया कंपनी द्रुपालला सास प्रोग्राम चालवायला मदत करते. कन्टेन्ट व्यवस्थापन, वेब होस्टिंग, ग्राहक डेटा व्यवस्थापन आणि विपणन व्यवस्थापन अशी मदत ही कंपनी करते. (IT Companies in Pune)

मेटलाईफ

ही हेल्थकेअर क्षेत्रातील टेक कंपनी आहे. मेटलाईफ ही प्रामुख्याने विमा कंपनी असली तरी सध्या या कंपनीने डेटा ॲनालिटिक्स आणि फिनटेक कंपनी म्हणूनही आपला विस्तार केला आहे. या शाखांमध्येही जगभरात मिळून कंपनीचे ४०,००० कर्मचारी आहेत. आणि भारतात पुणे हे कंपनीचं मुख्य केंद्र आहे. (IT Companies in Pune)

(हेही वाचा – PM-Usha Scheme : मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटीचे अनुदान मंजूर)

फाईव्हट्रॅन

फाईव्हट्रॅन हे ऑनलाईन डेटा देवाणघेवाणीसाठीचं व्यासपीठ आहे. ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे डेटा ते हाताळतात. डेटाची गोपनीयता, खाजगीपणा आणि सुरक्षा यांच्याबरोबरच ही कंपनी तुमच्या क्लाऊडमध्ये डेटा सुलभपणे कसा फिरवायचा यासाठीची यंत्रणा उभारते. (IT Companies in Pune)

क्राऊडस्ट्राईक

क्राऊडस्ट्राईक ही जागतिक स्तरावरील सायबर सुरक्षेत अग्रणी असलेली कंपनी आहे. कंपनीचं मुख्यालय टेक्सासला ऑस्टिन शहरात आहे. कंपनी अंतर्गत असलेले क्लाऊड किंवा इतर डेटाशी संबंधित यंत्रणांना सुरक्षा पुरवण्याचं काम ही कंपनी करते. पुण्यात अलीकडेच या कंपनीने आपलं मोठं इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट सेंटर उभारलं आहे. (IT Companies in Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.