Jammu and Kashmir : पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले 32,000 कोटींच्या विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन

पंतप्रधानांनी या वेळी जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सुमारे 1500 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश देखील वितरित केले. त्यांनी ‘विकसित भारत विकसित जम्मू’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.

178
Jammu and Kashmir : पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले 32,000 कोटींच्या विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन
Jammu and Kashmir : पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले 32,000 कोटींच्या विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये 32,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पेट्रोलियम आणि नागरी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत. पंतप्रधानांनी या वेळी जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सुमारे 1500 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश देखील वितरित केले. त्यांनी ‘विकसित भारत विकसित जम्मू’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.

(हेही वाचा – Maratha Reservation : चांगले होताना कुणी अपशकुन करू नये; अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सुनावले)

बचत गटाने बँकेचे कर्ज चुकते केले – किर्ती शर्मा 

कथुआच्या राष्ट्रीय आजीविका अभियानच्या लाभार्थी किर्ती शर्मा यांनी बचत गटासोबत जोडले गेल्यामुळे होत असलेल्या फायद्यांची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यांनी 30,000 रुपयांच्या कर्जाने आपला उद्योग सुरू केला आणि नंतर दुसऱ्यांदा एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन तीन गायींसह आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी केवळ आपल्या बचत गटासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील महिला स्वयंपूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली. त्यांच्या बचत गटाने बँकेचे कर्ज चुकते केले आहे आणि आता त्यांच्याकडे 10 गायी आहेत. त्या आणि त्यांच्या गटातील सदस्यांना अनेक सरकारी योजनांचे लाभ मिळाले आहेत. 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य देण्याचे त्यांनी पंतप्रधानांना आश्वासन दिले.

पंतप्रधानांचे आभार – शेतकरी लाल मोहम्मद

पूंछ जिल्ह्यातील शेतकरी लाल मोहम्मद यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की, ते सीमावर्ती भागात रहात असून मातीच्या गा-यापासून बांधलेल्या त्यांच्या घराला सीमेपलीकडून होणाऱ्या तोफगोळ्यांच्या भडीमाराला तोंड द्यावे लागत होते. या वेळी त्यांनी पीएम आवास योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी मिळालेल्या 1,30,000 रुपयांबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, ज्या घरात आता ते रहात आहेत. सरकारच्या योजना देशाच्या सर्वात जास्त दुर्गम भागातही पोहोचत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि पक्क्या घराबद्दल लाल मोहम्मद यांचे त्यांच्या पक्क्या घराबद्दल अभिनंदन केले. लाल मोहम्मद यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ ‘विकसित भारत’ या विषयावर एक दोहा देखील म्हणून दाखवला.

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी आपण जम्मू दौरे केले, त्‍यांची आणि आज प्रचंड संख्‍येने जमलेल्या या सभेची तुलना केली. आजच्या या कार्यक्रमाला अतिशय प्रतिकूल हवामान असतानाही लोक इतक्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ मोठ्या स्क्रीनवर सभा पहात आहेत. जम्मूच्या नागरिक मोठ्या संख्येने जमलेल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलही त्यांनी माहिती दिली. यावेळी मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या या भावनेचे कौतुक केले आणि हा कार्यक्रम म्हणजे त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. आजचा प्रसंग केवळ विकसित भारतापुरता मर्यादित नसून देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील लाखो लोकांचा यात समावेश असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जम्मू आणि काश्मीरमधील 285 ब्लॉकमधील नागरिक या कार्यक्रमाचे साक्षीदार होत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांमधील उत्साहाचे त्यांनी कौतुक केले.

या वेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) आणि केंद्रीय पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह (Jitendra Singh) उपस्थित होते. (Jammu and Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.