Seat Allocation Crisis : अखिलेश यादव यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत

काँग्रेससोबत इंडी आघाडीतील एकाही पक्षाचे जागा वाटप निश्चित झाले नाही. यामुळे आघाडी मधील एक एक सहकारी काँग्रेसला राम राम करीत आहेत. यावेळी समाजवादी पक्षाने देखील काँग्रेसला अडचणीत टाकले असल्याचे दिसून येत आहे.

203
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार

इंडी आघाडीचा (I.N.D.I. Alliance) जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही आहे. एकीकडे भाजप अतिशय जोमाने निवडणूकीच्या तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे काँग्रेससोबत इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) एकाही पक्षाचे जागा वाटप निश्चित झाले नाही. यामुळे आघाडीमधील एक एक सहकारी काँग्रेसला राम राम करीत आहेत. यावेळी समाजवादी पक्षाने देखील काँग्रेसला अडचणीत टाकले असल्याचे दिसून येत आहे. (Seat Allocation Crisis)

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. जागावाटपावर निर्णय होईपर्यंत सध्या उत्तर प्रदेशात असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसला १७ जागांची शेवटची ऑफर दिली आहे. (Seat Allocation Crisis)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी भाजपचा नवा नारा; ‘फिर एक बार मोदी सरकार’ असेल प्रचार गीत)

काँग्रेसला सपाचा इशारा

इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीनेही आता काँग्रेसला इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्लीमध्ये आपने एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सपा आणि काँग्रेसमध्ये अजूनही जागावाटपावर बोलणी सुरू आहेत. काही जागांवर काँग्रेस अडून बसल्याने बोलणी पुढे सरकत नसल्याची चर्चा आहे. (Seat Allocation Crisis)

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता काँग्रेसला १७ जागांची अखेरची ऑफर दिली आहे. त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास ते आघाडीतून बाहेर पडू शकतात. मुरादाबाद आणि बलिया या जागा काँग्रेसला हव्या आहेत. बलियातून प्रदेशाध्यक्ष अजय राय इच्छुक आहेत. मात्र, अखिलेश यांनी अल्टिमेटम दिल्याने काँग्रेसला एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे दिसते. अखिलेश यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशातील २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (Seat Allocation Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.