मातृभाषा (Mother Language) हा प्रत्येक राज्याचा अभिमानाचा वारसा आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीला प्रचंड ऐतिहासिक व साहित्यिक वैभव लाभलेलं आहे. अमृतातही पैजा जिंकेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेले आहेत. जगभरात मातृभाषेच्या उन्नतीसाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (International Mother Language Day) साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ की काय आहे International Mother Language Day?
भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (International Mother Language Day) साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ रोजी युनेस्कोने प्रथम याची घोषणा केली, २००२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने संयुक्त राष्ट्राच्या ठराव ५६/२६२ च्या स्वीकृतीसह औपचारिक मान्यता दिली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे असा आहे. मातृभाषेवर (Mother Language) आधारित शिक्षण देण्याची सुरुवात बालपणापासूनच झाली पाहिजे आणि ही भाषा हा शिक्षणाचा पाया असला पाहिजे, असे युनेस्कोचे म्हणणे आहे. कारण कोणतीही व्यक्ती तिच्या मातृभाषेत (Mother Language) लवकर शिकते. मात्र आपल्याकडे इंग्रजीचे खुळ इतके माजले आहे की इंग्रजीतून शिकणे हे परमकर्तव्य मानले जाते. (International Mother Language Day)
(हेही वाचा – Seat Allocation Crisis : अखिलेश यादव यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत)
हिंदू म्हणजेच ‘विविधता में एकता’
इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बांगलादेशात, बंगाली भाषेला मान्यता मिळावी यासाठी लढा देणाऱ्या बांगलादेशातील क्रांतिकारकांना श्रद्धांजली हा दिवस साजरा केला जातो. १९४७ मध्ये पाकिस्तानचे दोन वेगळे भाग होते, पूर्व पाकिस्तान (सध्या बांगलादेश म्हणून ओळखले जाते) आणि पश्चिम पाकिस्तान. भिन्न संस्कृती आणि भाषा असलेली ती दोन स्वतंत्र राष्ट्रे होती. भाषेच्या आधारावर वेगळी झालेली ही राष्ट्रे आहेत. मात्र भारतीय संस्कृतीला (Indian culture) जे चिकटून राहिले, ते कधीच वेगळे होऊ शकले नाही. कारण हिंदू म्हणजेच विविधता में एकता, म्हणून आपल्याकडे भाषिक राज्ये असली तरी आपण एक देश आहोत. (International Mother Language Day)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून, डिजिटल कंटेंट देशातील २२ अनुसूचित भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतातील इतर २३४ मान्यताप्राप्त भाषांमध्ये देखील हा कंटेंट वाचण्यास उपलब्ध असेल. म्हैसूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस येथे भारतवाणी प्रकल्पाच्या माध्यमातून जून २०१६ मध्ये डिजिटायझेशनला सुरुवात झाली आणि फेब्रुवारी २०१७ पर्यंत ६० भारतीय भाषांमधील कंटेंट मोफत उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे भारतात तरी मातृभाषेला (Mother Language) बढावा देण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. आपण आता यास बळकटी दिली पाहिजे. आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन आपण सुरुवात करु शकतो. (International Mother Language Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community