Maratha Reservation : मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळून आनंद व्यक्त; जरांगेंची मात्र हटवादी भूमिका

306
Maratha Reservation : मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळून आनंद व्यक्त; जरांगेंची मात्र हटवादी भूमिका
Maratha Reservation : मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळून आनंद व्यक्त; जरांगेंची मात्र हटवादी भूमिका

मराठा आरक्षण(Maratha Reservation) विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व मंत्रीमंडळासोबत विधानसभेतून बाहेर पडले. या वेळी मराठा समाजातील लोकं विधीमंडळ परिसरात मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.(Maratha Reservation)

(हेही वाचा- Seat Allocation Crisis : अखिलेश यादव यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत )

समाजाकडून हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत

कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन, हार, पुष्पगुच्छ स्वीकारले. मी सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती ३ महिन्यांच्या आत पूर्ण केली, याचा मला आनंद आहे, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.(Maratha Reservation)

मनोज जरांगेंनी हाताच सलाईन काढून फेकले

एकीकडे मराठा समाज(Maratha Reservation) मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा हटवादी भूमिका घेतली आहे. ‘मराठा विधेयकाने कल्याण होणार नाही. आम्हाला जे हवे आहे, ते आम्ही मिळवणारच आहे. आंदोलनाची घोषणाही उद्या करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. विधेयक नाकारण्याचे कारण नाही; पण ते टिकेल का ही शंका आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या विधेयकात सगेसोयरेंबाबत निर्णय न घेतल्याने जरांगे सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी हाताचं सलाईन काढून फेकलं. (Maratha Reservation)आम्ही ज्यासाठी आंदोलन केलं त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीची सरकारकडून चेष्टा करण्यात आली, असे म्हणत संताप व्यक्त केला. या वेळी मनोज जरांगे यांनी ‘मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे ? आता मराठ्यांची शक्ती काय आहे हे सरकारला कळेल’, असा इशारा दिला आहे.(Maratha Reservation)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.