Maratha Reservation : चांगले होताना कुणी अपशकुन करू नये; अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सुनावले

236
Maratha Reservation : चांगले होताना कुणी अपशकुन करू नये; अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सुनावले
Maratha Reservation : चांगले होताना कुणी अपशकुन करू नये; अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सुनावले

चांगले होतांना कुणी अपशकुन करू नये. विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत(Maratha Reservation) विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतो, ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चित टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असे माझे मत नाही. पण एखादे चांगले होत असताना कुणी अपशकुन करू नये,असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

(हेही वाचा- Manoj Jarange Patil मिळालेला जनाधार गमावण्याची शक्यता )

मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावे, यासाठी सरकारने २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले होते. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण(Maratha Reservation) विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याला काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे.

सरकारची नौटंकी – वडेट्टीवार यांची टीका

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण(Maratha Reservation) न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मते मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

त्यावर पूर्वी काँग्रेस नेते असलेले आणि आता भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.