विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्यातून उत्पादित केले पिण्यायोग्य पाणी एकत्र करून त्या पाण्याचे वितरण जनतेला करण्याकरिता सुसाध्यता अहवाल बनवला जात असून याच्या अभ्यासासाठी महापालिकेच्या (BMC)वतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. टंडन अर्बन सोल्युशन या कंपनीची सल्लागार (Consultant)म्हणून नेमणूक करण्यात आली आहे या सल्लागार सेवेसाठी तब्बल पावणेचार कोटी खर्च केले जाणार आहेत.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी अरबी समुद्रात सोडले जाते
मुंबई शहरामधील नागरिकांची पाण्याची आवश्यकता सध्या ४५०० दशलक्ष लिटर इतकी आहे, तर उपलब्ध पाणीपुरवठा हा ३८३० दशलक्ष लिटर एवढा आहे, त्यामुळे सध्या अंदाजे ६७० दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची तूट आहे, जी भविष्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत २२ जलाशयांमधुन शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच मुंबई शहराला(BMC) पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा बराचसा भाग सांडपाण्यात रुपांतर होऊन मुंबई शहरात बसवण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून अरबी समुद्रात सोडला जातो.(BMC)
(हेही वाचा- Maratha Reservation : चांगले होताना कुणी अपशकुन करू नये; अशोक चव्हाणांनी घेतली सरकारची बाजू )
पाण्याची तूट भरून काढण्यासाठी
यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) मलनिःसारण प्रकल्प या विभागाने ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) उभारुन सांडपाण्याचे तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया केलेल्या पाण्यात रूपांतर करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे, पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सात मल जल प्रक्रिया केंद्रातून निर्माण होणारे पाणी हे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित झाल्यावर ते पुढे योग्यरित्या मुंबईच्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेद्वारे एकत्रपणे वितरण करण्यासाठी सुसाध्यता अभ्यास करून त्याचा अहवाल बनवण्याचा निर्णय घेतला आहे.(BMC)
सल्लागार कंपनीची निवड
त्यानुसार, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय आधारावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेत टंडन अर्बन सोल्युशन ही कंपनी पात्र ठरली आहे या कंपनीला सल्लागार शुल्क म्हणून पावणे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या सल्लागार (Consultant) कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) मधून उत्पादित पाण्याचे पुढे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित झाल्यावर त्याचे महानगरपालिकेच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये एकत्रीकरण करण्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे.(BMC)
(हेही वाचा- Manoj Jarange Patil मिळालेला जनाधार गमावण्याची शक्यता )
विद्यमान पाणीपुरवठा प्रणालीच्या माहितीचे संकलन
यामध्ये मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) मधून उत्पादित प्रक्रिया होणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि वेळ यांचा अभ्यास करणे, पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करण्यासाठी लागणारी जमीन, मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) च्या आसपास असलेल्या विद्यमान पाणीपुरवठा प्रणालीच्या माहितीचे संकलन. तसेच मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) च्या सभोवतालच्या पाणी पुरवठा प्रणालीचा तपशीलवार हायड्रोलिक अभ्यास करणे. त्याचे झोनिंग, पुरवठ्याचे तास, दाब, समस्या, पुरवठा पॅटर्न समजून घेणे आणि प्रस्तावित उत्पादित मल जल केंद्रातील पिण्यायोग्य पाणी सामावून घेण्यासाठी मुख्य तथा वितरक प्रणालीची क्षमता ओळखणे आदींचा समावेश आहे.(BMC)
वितरण प्रणालीमध्ये बदल अथवा आवश्यकतेनुसार नवीन पाईपलाईन
याशिवाय वितरण प्रणालीमध्ये बदल करून अथवा आवश्यकतेनुसार नवीन पाइपलाइन, झडपा बसवून किंवा संबंधित संलग्न बांधकाम करून पाणी एकत्रीकरण प्रणालीची रचना करणे. उत्पादित पिण्यायोग्य पाण्याचे समायोजन करण्याकरिता त्याचा दाब, प्रमाण आणि वेळ निश्चित करणे, त्यानुसार एकत्रीकरण करता उदंचन केंद्राचे (Pumping Station) बांधकाम, या प्रणालीसाठी जागेची आवश्यकता ठरवणे, मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) मधून उत्पादित होणाऱ्या पिण्यायोग्य पाण्याचे जलवितरण व्यवस्थेत कार्यक्षम आणि अडथळा विरहीत एकत्रीकरण करण्यासाठी संपूर्ण प्रणालीची रचना करणे आदिंचाही अभ्यास केला जाणार आहे.(BMC)
अशाप्रकारे होणार अभ्यास
-विहार तलावामध्ये साठवण्यासाठी अथवा विहार तलावाच्या पाण्यामध्ये जमा करण्याबाबत सुसाध्यता अभ्यास, विहार तलावाची साठवण क्षमता, होणारा पाऊस आणि विहार तलाव पाणलोट क्षेत्राचा अभ्यास, विहार तलावाची उपयुक्त क्षमता, विहार तलाव आदी संबंधीचे सर्वेक्षण.
-विहार तलावामध्ये साठवण्यासाठी / विहार तलावाच्या पाण्यामध्ये समायोजनेसाठीचे उत्पादित पिण्यायोग्य पाण्याची क्षमता पाहून भांडुप कॉम्प्लेक्समध्ये नवीन जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र आणि पाण्याची साठवणुक करण्याकरिता बांधकाम यांचा व्यवहार्यता अभ्यास.
-विद्यमान पाणीपुरवठा प्रणाली, स्त्रोत, वितरण प्रणाली यांचा व्यवहार्यता अभ्यास, भांडुप कॉम्लेक्सच्या अनुबाह पाणीपुरवठा व्यवस्थेत वरील नमूद पाणी समायोजित करणे आणि हे अतिरिक्त पाणी सामावून घेण्यासाठी विद्यमान वितरण प्रणालीमध्ये बदल करणे,
– प्रत्येक मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) मधून उत्पादित पाण्याचे पुढे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित झाल्यावर त्याचे मुंबई महानगरपालिकेच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये आणि सेवा जलाशयांसह एकत्रीकरण
-भांडुप कॉम्प्लेक्समधील मुंबई महानगरपालिकेच्या विहार तलावात प्रत्येक मलजल प्रक्रिया केंद्र (WWTF) मधून उत्पादित पाण्याचे पुढे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित झाल्यावर त्याचे एकत्रीकरण करणे
-प्रत्येक प्रस्तावित उन्नत तृतीय स्तर प्रक्रिया केंद्रामधून उत्पादित पिण्यायोग्य पाण्यासाठी संभाव्य ग्राहक चाचपणी (जर पाणी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत एकत्रित करणे शक्य नसेल) ग्राहकांच्या प्रत्येक श्रेणीसाठी अंदाजीत वापर, पिण्यायोग्य पाणी आदींचा अभ्यास करणे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community