विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईतील ज्या ठिकाणी सर्वात जास्त कचरा निर्माण होतो त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने कचरा एकत्र जमा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) विभागाच्यावतीने कॉम्पॅक्टरचा वापर केला जातो. या कॉम्पॅक्टरमध्ये कचरा गोळा करून महापालिकेच्यावतीने हा कचरा भराव भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंडवर (Dumping ground) टाकण्यासाठी वाहून नेला जातो. मुंबईत अशाप्रकारे संपूर्ण मुंबईत ११२ कॉम्पॅक्टर्स असून याठिकाणी सर्व ठिकाणी ७५ चौक्यांचीही व्यवस्था केली आहे. यासर्व कॉम्पॅक्टर्सच्या ठिकाणी असलेल्या दुरवस्था झाली आहे, त्यांची दुरुस्ती तसेच कॉम्पॅक्टरची वाहतून कचरा भरणा केंद्रावर करण्यासाठीच्या कामांसाठी कंपनीची निवड करण्यात आल आहे.(Sweeper chowki)
(हेही वाचा- Krida Mahakumbh : अंतिम सामने बुधवारी मालवणीतील क्रीडा भारती मैदानात )
कचरा कायम स्वच्छ राखला जावा
मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणी जमा होणारा कचरा एकत्रितपणे कचरा भरणा केंद्रावर वाहून नेण्यासाठी महापालिकेच्यावतीने (Bmc) कॉम्पॅक्टर्स बसवण्यात आलेत. या कॉम्पॅक्टर्समध्येच कचरा टाकला जावा तसेच खाली पडलेला कचरा कायम स्वच्छ राखला जावा यासाठी सफाई कामगारांसाठी चौकी(Sweeper chowki) बनवण्यात आली आहे. अशाप्रकारे शहर भागामध्ये महापालिकेच्यावतीने ५१ स्थिर कॉम्पॅक्टर्स बसवण्यात आल्या आहेत, आणि त्याठिकाणी ३३ ठिकाणी चौकी(Sweeper chowki) आहेत. तर पश्चिम उपनगरात महापालिकेच्यावतीने ४० कॉम्पॅक्टर्स व ३० चौकी तसेच पूर्व उपनगरांमध्ये २१ कॉम्पॅक्टर्स आणि १२ ठिकाणी चौकी आदींच्य देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये चौक्यांची दुरुस्ती व देखभाल तसेच कॉम्पॅक्टर्समधून कचरा वाहून नेण्यासाठीच महापालिकेच्यावतीने(Bmc) कंपनीची निवड करण्यात आली आहे.
या कंपनीची केली निवड
महापालिकेच्यावतीने(Bmc) यापूर्वी नेमण्यात आलेल्या कामांचे कंत्राट संपुष्टात आल्याने महापालिकेच्यावतीने(Bmc) नवीन कंत्राटदाराची नेमणूक ही चौक्यांची(Sweeper chowki) दुरुस्ती व कॉम्पॅक्टर्समधून कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शहर भागातील कॉम्पॅक्टर्सची वाहतूक करणे व चौक्यांची दुरुस्ती आदींच्या कामांसाठी एस.एम.ट्रान्सपोर्ट कंपनी, पूर्व उपनगरासाठी एशियन ट्रेडर्स आणि पश्चिम उपनगरासाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी ८.०९ कोटी रुपये, पश्चिम उपनगरे याकरता ७.६० कोटी रुपये, पूर्व उपनगरे करता(Sweeper chowki)
३. २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
अशाप्रकारे होणार सफाई चौक्यांची दुरुस्ती
शहर भाग :
स्थिर कॉम्पॅक्टर चौकी : ३३
स्थिर कॉम्पॅक्टर्स : ५१
स्थिर कॉम्पॅक्टर्सची वाहतूक : ३३
कंत्राटदार : एस.एम. ट्रान्सपोर्ट कंपनी
कंत्राट खर्च : ८ कोटी ०९ लाख १३ हजार
पश्चिम उपनगरे विभाग :
स्थिर कॉम्पॅक्टर चौकी : ३०
स्थिर कॉम्पॅक्टर्स : ४०
स्थिर कॉम्पॅक्टर्सची वाहतूक : ३०
कंत्राटदार : एशियन ट्रेडर्स
कंत्राट खर्च : ७ कोटी ६० लाख ९४ हजार रुपये
पूर्व उपनगरे:
स्थिर कॉम्पॅक्टर चौकी : १२
स्थिर कॉम्पॅक्टर्स : २१
स्थिर कॉम्पॅक्टर्सची वाहतूक : १२
कंत्राटदार : लक्ष्य एंटरप्रायझेस
कंत्राट खर्च : ३ कोटी २६ लाख ८२ हजार रुपये
हेही पहा-
Join Our WhatsApp Community