सध्या देशात महाराष्ट्रासह अवकाळी पावसाची शक्यता (Unseason Rain) हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे देशात कुठे थंडी तर कुठे पाऊस असे वातावरण दिसणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. तर, बहुतांश भागात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे.
कधी होणार पाऊस?
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 21 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस पडण्याची (Unseason Rain) शक्यता आहे. देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असताना मैदानी भागात पावसाची हजेरी लागणार असल्याने हवामान बदललेले पाहायला मिळत आहे. 21 फेब्रुवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
(हेही वाचा International Mother Language Day : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन?)
महाराष्ट्रातही पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Unseason Rain) वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये कोरडे हवामान कायम राहील. मुंबईच्या हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community