तुमच्यासोबतचे आमदार तुम्हाला सोडून गेले आहेत, तुम्ही एकाकी पडलात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा शरद पवार यांनी आमदार सोडून जाणे चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. १९८० साली ए आर अंतुले (A. R. Antulay) मुख्यमंत्री असताना असेच झाले होते. मी परदेशात असताना ५९ पैकी ५४ आमदार सोडून गेले होते. पण, नंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या आमदारांपैकी ९५ टक्के आमदार पराभूत झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की, असा विश्वास शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
इंडि आघाडीतील वादावर काय म्हणाले पवार?
इंडि आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यापर्यंत सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
(हेही वाचा मराठा आरक्षण टिकले तर आनंदच; पण मनात शंका; Maratha Reservation विधेयकावर काय म्हणाले शरद पवार?)
भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा
दुसऱ्या बाजूने भाजपाच्या बाहेर राहून काम करणारे, केंद्रापेक्षा वेगळी भूमिका घेऊन काम करणारे या सगळ्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि इतर तपासयंत्रणा यांच्या माध्यमातून दडपण आणले जात आहे. जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेत त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतली जाते. आज असे बोलले जाते भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा. असे चित्र भाजपाविषयी केले जात आहे. ज्यांचे हात कुठेतरी अडकले आहेत अशा लोकांसमोर दहशत निर्माण करुन आपल्याकडे ओढले जाते ही स्थिती दिसते, असेही पवार (Sharad Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community