मराठा आरक्षणावर जे विधेयक मंजूर केले आहे, त्याचा काहीही फायदा नाही. याआधीही हाच कायदा केला होता, जो नंतर नाकारला गेला, पुन्हा तेच विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे ही फसवणूक आहे. पुन्हा मराठा मुलांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासघात होईल असे वागू नये.सगेसोयरे यांच्याविषयी आधी निर्णय घ्यायला हवा. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष अधिवेशनात आमदार म्हणतात आम्हाला बोलू दिले नाही, त्यांनी पत्र दाखवावे, त्यांना सगेसोयरे यावर बोलायचे आहे, असे पत्र लिहिलेले दाखवावे, आता आम्ही फसणार नाही. नागपुरातही कुणी बोलले नव्हते. मराठा समाजामुळे मराठा समाजाच्या आमदारांच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे आहेत. हे कपडे मराठा तरुणांच्या नागावर हवेत. समाजाच्या उपयोगाला पडत नाही तर काय कामाचे. निवडणूक होऊच शकत नाही, ५-७ कोटी मराठा समाज आहे, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. आंदोलनाची तारीख निश्चित केल्यावर अजिबात माघार घेणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community