पुणे शहर अनेकविध गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे. आता अमलीपदार्थाचा कोट्यवधी रुपयांचा साठा पुण्यात सापडत असल्याने पुन्हा एकदा पुणे चर्चेला आले आहे. मागील ४ दिवसांपासून पुणे पोलीस छापेमारी करत आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतून तब्बल १८०० कोटींचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहे. अवघ्या 3 दिवसात पुणे पोलिसांनी ४००० कोटी रुपयांचे २००० किलो एम डी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटक देखील केली आहे. पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा Sharad Pawar : आमदार सोडून गेले, एकाकी पडलात का? पत्रकारांच्या प्रश्नावर काय म्हणाले शरद पवार?)
पुण्यातील ड्रग्ज (Drugs) प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊन नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांनी शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या शाखांनी पुणे, कुरकुंभ आणि दिल्ली येथेही छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी अवघ्या ३ दिवसांत ४००० कोटी रुपयांचे २००० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. दिल्ली क्राईम ब्रँचने टाकलेल्या पहिल्या छाप्यात ६०० किलो ड्रग्ज सापडले होते तर दुसऱ्या छाप्यात १२०० कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले होते.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया
- १८ फेब्रुवारी : सोमवार पेठेतील छापेमारीमध्ये २ किलो एमडी जप्त (Drugs)
- १९ फेब्रुवारी : विश्रांतवाडी येथील गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो एमडी जप्त
- २० फेब्रुवारी : कुरकुंभ एमआयडीसी मधील एका कारखान्यात ११०० कोटी रुपयांचे ड्रग्ज मिळाले
- २० फेब्रुवारी : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. ८०० कोटी रुपयांचे ४०० किलो एमडी (Drugs) केले हस्तगत
- २१ फेब्रुवारी पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत मिळून आले १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो एमडी जप्त
Join Our WhatsApp Community