Mahavikas Aghadi ने Vanchit आघाडीला जागावाटपापासून ठेवले ‘वंचित’

राज्यातील महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम झाल्याचे जाहीर केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला जागावाटप चर्चेपासून ‘वंचित’ ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

228
मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय

राज्यातील महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम झाल्याचे जाहीर केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटप चर्चेपासून ‘वंचित’ ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Mahavikas Aghadi)

महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण

आज बुधवारी २१ फेब्रुवारीला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (शप) गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी जागावाटप जवळपास झाले असल्याचे सांगत २-३ जागांवर अंतिम निर्णय आघाडीचे प्रमुख नेते म्हणजेच सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि आपण घेणार असल्याचे स्पष्ट केले. (Mahavikas Aghadi)

(हेही वाचा – Ameen Sayani : आकाशावणीचा भारदस्त आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन)

३९ मुद्यांना केराची टोपली

याचा स्पष्ट अर्थ असा होतो की वंचित (Vanchit) आघाडीने दिलेल्या ३९ मुद्द्यांना महाविकास आघाडीतील तीनही काँग्रेस-शिवसेना उबाठा-राष्ट्रवादी शप पक्षांनी केराची टोपली दाखवली आणि जागावाटप चर्चेतही वंचित (Vanchit) आघाडीला बाहेर ठेवले. इतके होऊनही वंचित (Vanchit) आघाडी ३९ मुद्यांवर ठाम असून यावर चर्चा झाल्यानंतर जागावाटपावर चर्चा करू अशी भूमिका घेत आहे. (Mahavikas Aghadi)

आधी अजेंडा मग जागावाटप

“वंचित (Vanchit) बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने ८ फेब्रुवारीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम (अजेंडा) पाठवला होता. हा अजेंडा आम्ही संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना वैयक्तिकरित्या पाठवला आहे. मात्र, बारा दिवस उलटूनही आम्हाला अजेंड्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लवकरच वंचितच्या (Vanchit) अजेंड्यावर एकमताने सहमत होतील. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आमच्या प्रस्तावित अजेंड्यावर निर्णय घेतल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल आणि आम्हाला लवकरच चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल,” अशी आशा बाळगत असल्याचेही वंचितचे (Vanchit) राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. (Mahavikas Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.