मागील तीन दिवसांत पुण्यातील विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या महत्वपूर्ण कारवाईत तब्बल २ हजार किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमलीपदार्थांची किंमत तब्बल ४ हजार कोटी रुपये आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे. अंमलीपदार्थांचे जाळे देशभरात पसरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे (Crime) दाखल आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, कुरकुंभ एमआयडीसीमधील औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. हैदर शेखच्या विश्रांतवाडी येथील गोदामामधून ५५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती. अधिक तपासात छापा मारून जवळपास ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले होते. पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एमडीचा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कंपनीतून पुणे शहर, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, मुंबई, मिरा-भाईंदरसह दिल्ली, बंगलोर आणि हैद्राबाद अशा प्रमुख शहरांत एमडीची पुरवठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत. त्यात याआधी २२०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर सांगलीतूनही तब्बल १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त करण्यात आले आहे. सांगलीतून कुरिअरद्वारे पुढे पाठवण्यात येणार होते. अजून ५० किलो एमडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – Riot : छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक; पोलिसांनी केला लाठीमार )
याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तेथूनच पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सुत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. यावरून ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे.
हेही पहा –