सध्या सर्वत्र वर्क फ्रॉम होमचा बोलबाला आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. अजूनही अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी देशातील कोणत्याही काना-कोपऱ्यात बसून काम करू शकतात. (Work From Home)
वर्क फ्रॉम होममुळे प्रवासाचा वेळ वाचत असला, तरीही याने अनेक वेळा अडचणीही येतात. टीसीएसचे (TSC) मुख्य कार्यकारी अधिकारी के. क्रितिवासन यांनी या पद्धतीचे काम बंद करण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – Riot : छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक; पोलिसांनी केला लाठीमार)
वरिष्ठांचे काम पाहून सहकारी काम शिकतात
कार्यालयात काम करतांना वरिष्ठांचे काम पाहून इतर सहकारी काम शिकत असतात. घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही. टीसीएस टीम वर्क आणि फेलोशिपला महत्त्व देते. कोरोना काळात ३०-४० टक्के कर्मचारी भरती करण्यात आली. ते कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते कंपनीची मूल्ये आणि संस्कृती कशी आत्मसात करतील, असा प्रश्न के. क्रितिवासन यांनी उपस्थित केला. ते नॅसकॉम कार्यक्रमात बोलत होते.
कार्यालयीन वातावरणच सर्वांत प्रभावी
के. क्रितिवासन (K. Kritivasana) पुढे म्हणाले की, “वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी कसे काम करतात, हे पाहून इतर कर्मचारी शिकत असतात. टीसीएस वर्क फ्रॉम होम पद्धतीला समर्थन देत नाही. पारंपरिक कार्यालयीन वातावरणच सर्वांत प्रभावी पद्धत आहे. आमचे सर्व कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येण्यास इच्छुक आहेत.”
कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावे लागेल
टीसीएसमध्येही कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. नंतर सर्व सुरळीत झाल्यानंतरही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना अजून एकदा अल्टिमेटम दिला आहे. ”आम्ही संयम बाळगत आहोत. परंतु, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात जावे लागेल अशी तत्वतः भूमिका घेतली आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना यावर अंतिम निर्णय पाठवला आहे. जर ते कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असे मुख्य कार्यकारी अधिकारी एनजी सुब्रमण्यम (NG Subramaniam) म्हणाले आहेत. (Work From Home)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community