किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) मागणीसाठी हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), उत्तर प्रदेशातील शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीत घुसून आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. हे शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Farmers Protest)
(हेही वाचा – ZEE-Sony Merger : विलिनीकरणावर चर्चा नाही, झी कंपनीचे नवीन व्यवहार सेबीच्या रडारवर)
१४ हजार शेतकरी सीमेवर सज्ज
२१ फेब्रुवारी रोजी दुपारी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवून दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून चालू होता. १४ हजार शेतकरी १२०० ट्रॅक्टर्स घेऊन शंभू सीमेवर उभे आहेत. २०० कार, १० मिनी बसेस घेऊन हे शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत आहेत.
या वेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रूधुराचा मारा केला. या सीमेवर अधिक पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे.
शंभू सीमेप्रमाणे सिंघू सीमेवर (singhu border) १४ हजार शेतकरी जमले आहेत. धाबी-गुजरन सीमेवर (DHABI-GUJRAN BORDER) साधारण ४५०० शेतकरी जमा झाले असून त्यांच्याकडे ५०० ट्रॅक्टर्स आहेत.
शेतकऱ्यांना सरकारचे प्रस्ताव मान्य नाहीत
दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात दिल्लीचे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. त्यामुळे या वेळी शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. बॅरिकेट्सचा अडथळा दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या वस्तू आणल्या आहेत, त्या जप्त कराव्यात, असे आवाहन हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना केले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. शेतकऱ्यांना सरकारचे कोणतेच प्रस्ताव मान्य नाहीत. केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. (Farmers Protest)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community