Rajyasabha election 2024 : 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान

225
Rajyasabha election 2024 : 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान
Rajyasabha election 2024 : 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, 41 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून,(Rajyasabha election 2024) त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

(हेही वाचा- Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको; २४ फेब्रुवारीपासून दररोज मराठा आरक्षणाचे आंदोलन )

नवी दिल्ली(New Delhi),21 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेची निवडणूक(Rajyasabha election 2024) होत असल्याने देशभरातील जनतेचं लक्ष या निवडणुकीच्या निकाला कडे लागले आहे.(Rajyasabha election 2024)
राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते(Rajyasabha election 2024). मात्र, 41 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून, त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार(Rajyasabha election 2024)आहे.

(हेही वाचा- ZEE-Sony Merger : विलिनीकरणावर चर्चा नाही, झी कंपनीचे नवीन व्यवहार सेबीच्या रडारवर )

आमदार फोडण्याची भीती
उत्तर प्रदेशसह हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या जागांवरील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार फोडोफोडीची भीतीही व्यक्त केली जात आहे.(Rajyasabha election 2024)

41 जागा बिनविरोध
राज्यसभेच्या 41 जागा बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांसह काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा(J. P. Nadda), केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav), एल. मुरुगन आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 20 जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसला सहा, तृणमूल काँग्रेसला चार, वायएसआर काँग्रेसला तीन, राजद आणि बीजेडीला प्रत्येकी दोन तर एनसीपी, शिवसेना व बीआरएसला प्रत्येक एक जागा मिळाली आहे.(Rajyasabha election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.