मुंबईत शनिवारी रुग्ण संख्या पुन्हा कमी होऊन २ हजार ६७८ एवढे रुग्ण आढळून आले. तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात येताना दिसत असल्याने थोड्या प्रमाणात दिलासा देणारी ही बातमी आहे.
मुंबईत शनिवारी २,६७८ एवढे रुग्ण आढळून आले. मात्र, शनिवारी दिवसभरात एकूण ३ हजार ६०८ रुग्ण बरे होवून घरी परतले. शनिवारपर्यंत ४८ हजार ४८४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. तर शनिवारी दिवसभरात जिथे ३३ हजार ३७८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ३१ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ३७ पुरुष व २५ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ३८ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २१ एवढा होता. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर शनिवारी जिथे १३८ दिवस एवढा होता, तिथे शनिवारी ते १४५ एवढा झाला होता.
(हेही वाचा : कोरोना नियंत्रणाचे आभासी चित्र उभे करू नका! देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )
एकेवेळी मुंबईतील सील इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १२०० वर पोहोचली होती, तिथे ही संख्या आता निम्म्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ६१७ सील इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या होती, ती शनिवारी ५८१ एवढी होती. तर कंटेन्मेंट झोन झालेल्या झोपडपट्टींची संख्या जिथे शुक्रवारी ९६ एवढी होती, तिथे शनिवारी ९३ एवढी झाली होती.
दादर, माहिम आणि धारावी शंभरीच्या आतच
मुंबईत मागील काही दिवसांपासून दीडशेच्या आत आलेली माहिम,दादर आणि धारावी या जी उत्तर विभागातील रुग्ण संख्या शनिवारी आणखी घटली. शनिवारी या तिन्ही विभागांमध्ये एकूण ६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर या तिन्ही विभागांमध्ये सध्या एकूण ४४८१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. यात धारावीमध्ये १८ रुग्ण, दादरमध्ये २७ आणि माहिममध्ये २९ अशा प्रकारे एकूण ६४ रूग्णांची नोंद झालेली आहे.
Join Our WhatsApp Community