Maheshchandra Bhattacharya : भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्कृत विद्वानांपैकी एक महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य

Maheshchandra Bhattacharya : महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांना महामहोपाध्याय ही पदवी १६फेब्रुवारी १८८७ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या जयंती निमित्त प्राच्यविद्येतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आली.

164
Maheshchandra Bhattacharya : भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्कृत विद्वानांपैकी एक महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य
Maheshchandra Bhattacharya : भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्कृत विद्वानांपैकी एक महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य
महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य हे संस्कृतचे विद्वान आणि १८७६ ते १८९५ दरम्यान संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८३६ रोजी एका कुलीन ब्राह्मण कुटुंबात झाला. भट्टाचार्यांचे कुटुंब फार पूर्वीपासूनच विद्वान म्हणून प्रचलित होते. त्यांचे वडील हरिनारायण तर्कसिद्धांत आणि त्यांचे काका गुरुप्रसाद तारकपंचानन आणि ठाकूरदास चुरामणी हे प्रख्यात पंडित होते. त्यांचे मोठे बंधू पंडित माधबचंद्र सर्वभौमा हे महिषादल राज्याचे सभा पंडित होते. (Maheshchandra Bhattacharya)
१८७६ मध्ये ते प्रसन्नकुमार सर्वाधिकारी यांच्यानंतर संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. प्राचार्य म्हणून त्यांनी १९ वर्षे काम केले आणि या कार्यकाळात त्यांनी संस्कृत शिक्षणाच्या विशेष विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी संस्कृत पदवी परीक्षा सुरू केली. भट्टाचार्य हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे मित्र आणि सहकारी होते.
पायाभूत सुविधा विकसित करण्यात आघाडीची भूमिका
त्यांनी त्यांच्या मूळ गावी नरित येथे माध्यमिक अँग्लो-संस्कृत शाळा सुरू केली, जी आजही न्यायरत्न संस्था (Nyayaratna Sanstha) म्हणून सुरु आहे. विशेष म्हणजे ते एकोणिसाव्या शतकातील कोलकात्यातील सर्वात प्रतिष्ठित बंगाली व्यक्ती होते. तसेच ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्कृत विद्वानांपैकी एक होते. नारितच्या विकासात देखील त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी नारित आणि आसपासच्या परिसरात रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या तसेच हावडा येथे ट्रामवे, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यातही त्यांनी आघाडीची भूमिका बजावली होती.
महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांना महामहोपाध्याय ही पदवी १६फेब्रुवारी १८८७ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या जयंती निमित्त प्राच्यविद्येतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आली. ते तत्कालीन पश्चिम बंगाल, बिहार आणि ओरिसा राज्यांचा समावेश असलेल्या बंगाल प्रेसिडेन्सीच्या संस्कृत शिक्षणाचेही प्रभारी होते. (Maheshchandra Bhattacharya)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.