Dombivali Crime : तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतरही केली लूट

216
Dombivali Crime : तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतरही केली लूट
Dombivali Crime : तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतरही केली लूट

गुन्हयातुन जामीनावर सुटका होवुन तुरुंगातून बाहेर येताच लगेच जबरी चोरी, शिवीगाळी, (Dombivali Crime)दमदाटी करुन मारहाण करणे, घातक शस्त्र वापरुन दंगा करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी भा.दं.वि. प्रकरण १६ व १७ खालील गंभीर स्वरुपाचे गुन्हे व भारतीय हत्यार अधिनियम भाग ५ असे गंभीर स्वरूपाच्या एकुण १० गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाने भररस्त्यात एकाच्या(Dombivali Crime) गळ्यावर चाकू लावत लुटले. त्याने तरुणाला वाचविण्यासाठी आलेल्या लोकांनाही धमकविले. या प्रकरणी हव्या असलेल्या गुंडास डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक करून गजाआड केले.(Dombivali Crime)

(हेही वाचा- Subhash Chaudhary : नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी निलंबित )

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,(Dombivali Crime) अक्षय दाते असे अटक केलेल्या गुंडाचे असून हा वांगणी ( पश्चिम) ता. अंबरनाथ येथून अटक करून मध्यवर्ती कारागृह, कळंबा(Kalamba Jail), कोल्हापुर येथे ठेवण्यात आले आहे. एकुण १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंध व्हावा याकरीता महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (सुधारीत १९९६) चे कलम ३ (१), दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरसी) अधिनियम(Dombivali Crime) १९९७ अन्वये स्थानबध्द्तेची कारवाईसाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांना प्रस्ताव सादर करण्यात होता. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी १५ फेब्रूवारी रोजी एक वर्ष कालावधीकरीता स्थानबध्द करणेबाबतचा आदेश देण्यात आला आहे. १४ तारखेला सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हर्षद भारत सरवदे हे डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीत चहा पित होते.

तडीपार अक्षय दाते हा तडीपार गुंड डोंबिवली(Dombivali Crime) परिसरात येऊन सरवदे यांना धक्काबुक्की केली. सरवदे यांनी प्रतिकार केला असता गुंडाने सरवदे यांच्या गळयाला चाकू लावून खिशातील २,६०० रुपये रोख रक्कम व आधारकार्ड व पॅनकार्डची झेरॉक्स जबरीने खेचुन पोलीसांना कोणालाही काही सांगितल्यास त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. रस्त्यात हा प्रकार सुरू असताना सरवदे यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या लोकांच्या अंगावर धावत जाऊन अक्षय दातेने चाकु त्यांचे दिशेने फिरवुन त्यांना सुध्दा जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अक्षयवर दहशत माजविली म्हणुन डोंबिवली(Dombivali Crime) पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९४, ३९७, ५०४, ५०६, ५०६ (२), ३४ सह म. पो. का. कलम ३७(१) १३ १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.(Dombivali Crime)

सदरची कामगिरी दत्तत्रय शिंदे(Dattatraya Shinde), अपर पोलीस आयुक्त दत्तातय शिंदे , पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस सहायक पोलीस आयुक्त ( डोंबिवली विभाग ) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन गिते, सपोनि बळवंत भराडे, पोहवा अनंत डोके, पोना दिलीप कोती, पोना शरद रायते, पोहवा विशाल वाघ, पोहवा सुनिल भणगे, पोहवा निसार पिंजारी, पो.शि शिवाजी राठोड, पोशि देविदास पोटे यांनी केलेली आहे.(Dombivali Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.