Savarkar Sadan : BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची ‘सावरकर सदन’ला सदिच्छा भेट

Savarkar यांना ‘स्वातंत्र्यवीर’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ खूप मोठे पुरस्कार

193
Savarkar Sadan : BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची ‘सावरकर सदन’ला सदिच्छा भेट
Savarkar Sadan : BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची ‘सावरकर सदन’ला सदिच्छा भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी आज बुधवारी २१ फेब्रुवारीला सायंकाळी दादर छत्रपती शिवाजी पार्क येथील सावरकर यांनी वास्तव्य केलेल्या ‘सावरकर सदन’ला (Savarkar Sadan) या निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली आणि सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.(Savarkar Sadan)

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार (Ashish Shelar), स्वातंत्र्यवीर सावरकर (Svatantraveer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) उपस्थित होते.

WhatsApp Image 2024 02 21 at 10.34.53 PM

(हेही वाचा- Deepak Kesarkar : पालकमंत्री दिपक केसरकर यांचे घड्याळ पडते मागे )

भारतरत्न पुरस्कारची कधी मागणी केली नाही, करणार नाही

नड्डा यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. यावेळी रणजित सावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केंद्र सरकारने अद्याप ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला नसल्याबद्दल विचारले असता रणजित सावरकर यांनी सांगितले की, “सावरकर यांना स्वातंत्र्यवीर आणि हिंदुहृदयसम्राट या दोन पुरस्कार मिळाले ते खूप मोठे आहेत त्यामुळे आम्ही भारतरत्न पुरस्कारची कधी मागणी केली नाही आणि करणार नाही.”(Savarkar Sadan)

केंद्रातील सरकार हे सावरकर विचारांचे 

“आजचे केंद्रातील सरकार हे सावरकर विचारांचे असून भारत अधिक सक्षम, समृध्द्ध व्हावा यासाठी कटिबद्ध आहे. जिथे जिथे सावरकर यांचे विचार जातात तिथे आम्ही निश्चितच उभे राहू आणि सावरकरांना अपेक्षित सरकार येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे सावरकर यांनी स्पष्ट केले. (Savarkar Sadan)

आपण निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर सावरकर म्हणाले, “मी कधीही निवडणूक लढविण्यात इच्छुक नव्हतो आणि नसेन. माझं एकच काम आहे ते म्हणजे सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणे.” (Savarkar Sadan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.