कंबोडियाच्या उत्तरी प्रांतामध्ये सीम रीप या शहराजवळ अंगकोर हे दक्षिणपूर्व आशियातील एक सर्वात महत्त्वाचे पुरातत्व मंदिरांचे कॉम्प्लेक्स आहे. हे अंदाजे 400 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे आणि त्यात बरीच मंदिरे, हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स (खोरे, डाईक, जलाशय, कालवे) आहेत. कित्येक शतकांपासून अंगकोर हे ख्मेर राज्याचे केंद्र होते. सुंदर स्मारके, अनेक भिन्न पुरातन शहरी योजना आणि मोठ्या जलाशयांसह एक अपवादात्मक सभ्यतेची साक्ष देणारी वैशिष्ट्ये ही अंगकोरची असामान्य वैशिष्ट्ये आहेत. अंगकोर वॅट, बायॉन, प्रेह खान अशी ख्मेर स्थापत्यकलेची उदाहरणे असलेली प्राचीन मंदिरे जीवंत साक्षी पुरावे आहेत. क्रमिक राजधान्यांचे आर्किटेक्चर आणि लेआउट ख्मेर साम्राज्यात उच्च स्तरीय सामाजिक सुव्यवस्था आणि क्रमवारीची साक्ष देते. म्हणूनच अंगकोर हे सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रतिकात्मक मूल्यांचे उदाहरण आहे, तसेच उच्च वास्तुशास्त्रीय, पुरातत्व आणि कलात्मकलेचा नमुना देतात.
अंगकोर वॅटची रचना!
१३व्या शतकापर्यंत अंगकोर वॅट हे राजकीय, सांस्कृतिक किंवा व्यावसायिक महत्त्व राहिलेले नसले, तरी ते १८००च्या दशकात बौद्ध धर्माचे महत्त्वपूर्ण स्मारक राहिले होते. १८४०मध्ये फ्रेंच अभ्यासक हेनरी मौहोत यांनी अंगकोर वॅट सखोल अभ्यास केला. त्यावेळेस त्यांनी असे सांगितले होते की, अंगकोर वॅट हे युरोपमधील ग्रीक किंवा रोमन लोकांनी तयार केलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा मोठे आहे. हेनरी मौहोत यांनी मंदिराच्या रचनेचे कौतुक केले. जे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या शिकवणीनुसार, मेरु पर्वत या देवतांचे घर आहे, असे मानले जाते. त्याचे पाच बुरुज मेरू डोंगरातील पाच शिखरे पुन्हा तयार करण्याचा हेतू दर्शवतात, तर खाली भिंती व खंदक सभोवतालच्या पर्वतरांगा आणि समुद्राचा सन्मान करतात.
(हेही वाचा : बिबट्याचे संवर्धन ही काळाची गरज!)
मंदिराच्या भिंती हजारो कोरीव कामाने सजवल्या आहेत!
‘अंगकोर वॅट’च्या बांधकामाबरोबर, ख्मेर राज्याने त्यांची स्वतःची वास्तुशैली विकसित केली, जी वाळूचा दगडांवर होती. अशा प्रकारे अंगकोर वॅट वाळूचा खडकांच्या ब्लॉक्सने बांधले गेले. रुंद खंदकांनी वेढलेल्या १५ फूट उंच भिंतीमुळे शहर, मंदिर आणि रहिवाश्यांना संरक्षण मिळाले. त्या तटबंदीचा बराचसा भाग अजूनही उभा आहे. मंदिराच्या भिंती हजारो कोरीव कामाने सजवल्या आहेत. ज्यात हिंदू आणि बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या देवता आणि व्यक्तीरेखांचे तसेच त्याच्या कथात्मक परंपरेतील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिनिधित्व सादर केले आहे. देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाचेदेखील कोरीव काम येथे पाहावयास मिळते.
५ लाख पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात!
अंगकोर वॅट १८०० च्या दशकापर्यंत वापरात राहिले असले, तरी याचे जंगलवाढ, भूकंप आणि युद्धामध्ये लक्षणीय नुकसान झाले. १९७०च्या दशकात जेव्हा कंबोडिया क्रूर गृहयुद्धात पडले, परंतु अंगकोर वॅटचे काही प्रमाणात चमत्कारीकरित्या तुलनेने कमी नुकसान झाले. व्हिएतनाममधील काही निरंकुश आणि बर्बर ख्मेर राजवटीने केलेल्या हल्ल्याची आजही तेथील भिंतींवरील बंदुकीच्या गोळ्यांची छिद्रे साक्ष देतात. तेव्हापासून, कंबोडियन सरकारच्या पुढाकारामुळे आणि भारत, जर्मनी आणि फ्रान्सच्या प्रतिनिधींसह आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांमुळे अंगकोर वॅट जीर्णोद्धाराला मोठा हातभार लावला गेला. १९९२मध्ये अंगकोर वॅटची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये निवड झाली. सुमारे ५,००,००० पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात. येथून दिसणाऱ्या सूर्योदयाचे फोटो घेण्यासाठी भल्या पहाटे पर्यटकांची गर्दी जमते. कंबोडियन लोकांसाठी ही साइट राष्ट्रीय अभिमानाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे.
Join Our WhatsApp Community