Krida Mahakumbh : नोंद गिनीज बुक रेकॉर्ड्समध्ये

क्रीडा महाकुंभात घेतला अडीच लाख विद्यार्थी, युवकांचा भाग; पारंपारिक खेळाच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन आता राज्यभर

477
Krida Mahakumbh : नोंद गिनीज बुक रेकॉर्ड्समध्ये

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh) २०२३-२४ चा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीत समारोप बुधवारी करण्यात आला. क्रीडा महाकुंभातून एक प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पारंपरिक खेळांना उजाळा मिळाला असून क्रीडा महाकुंभाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद झाली आहे. एकाचवेळी १७ प्रकारचे पारंपरिक खेळ घेणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा ठरल्यामुळे ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये या स्पर्धेची नोंद घेण्यात आली. ‘वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया’च्या सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंकज पाठक यांनी सन्मानपत्र स्वीकारले. (Krida Mahakumbh)

महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका आणि क्रीडा भारतीकडून संयुक्तपणे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh) २०२३-२४ चे आयोजन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त रमाकांत बिरादार, उप आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मालाड येथील क्रीडा भारती मैदानावर (अंबुजवाडी मैदान) आयोजित समारोप सोहळ्यास मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, क्रीडा भारतीचे पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. (Krida Mahakumbh)

(हेही वाचा – World Scout Day: जागतिक स्काउट्स दिनाचे महत्त्व !)

यासाठी भरवला क्रीडा महाकुंभ

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पारंपरिक खेळ आजच्या स्पर्धेच्या युगात मागे पडू नयेत. महाराजांच्या काळातील शौर्याची क्रीडा संस्कृती आताच्या युवा पिढीत रुजावी म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरविण्यात आला होता. तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी या महाकुंभात सहभाग घेत शिवकालीन पारंपरिक खेळांना आणि स्पर्धांना उजाळा दिला, असे उद्गार बक्षीस वितरण प्रसंगी क्रीडा भारतीचे संघटनमंत्री प्रसाद महानकर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन सांगितले. (Krida Mahakumbh)

महाराजांच्या मावळ्यांच्या शौर्याचे स्मरण

एकाचवेळी १७ प्रकारचे पारंपरिक खेळ घेणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि क्रीडा भारतीने या महाकुंभाचे (Krida Mahakumbh) आयोजन करून पारंपरिक खेळाचे महत्त्व पटवून दिले. या महाकुंभात पावनखिंड दौडचे आयोजन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले, हे कौतुकास्पद आहे, असे महानकर यांनी स्पष्ट केले. (Krida Mahakumbh)

(हेही वाचा – Indulal Yagnik: जर्मनीतून भारतीय तिरंगा लपतछपत सुखरुप भारतात आणणारे इंदू चाचा कोण होते?)

महाकुंभात अडीच लाखांपेक्षा अधिक खेळाडू

वरळी येथील जांबोरी मैदानावर २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ झाला होता. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी ही स्पर्धा पार पडली. त्यात अडीच लाखांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले. (Krida Mahakumbh)

पुढील वर्षापासून राज्यभर आयोजन

क्रीडा महाकुंभात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन गटांत १७ प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. वैयक्तिक गटात मल्लखांब, मॅरेथॉन, पंजा लढवणे, मल्लयुद्ध, दंड बैठक, दोरी उड्या, शरीर सौष्ठव या स्पर्धा झाल्या. सांघिक गटात लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, मल्लखांब, लंगडी, रस्सी खेच, विटी दांडू, फुगडी, ढोल ताशा पथक आणि खो-खो आदी स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी झाले. दंड बैठक, पंजा लढवणे, दोरीवरील उड्या या स्पर्धांना सर्वाधिक स्पर्धक लाभले. महिला स्पर्धकांची संख्या ३० टक्के होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh) पुढील वर्षापासून राज्यभर आयोजित करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Heinrich Hertz : हाइनरिक हेर्ट्झ – ज्यांच्या नावावरून फ्रिक्वेन्सीच्या एककाला हर्ट्झ नाव पडले)

महाअंतिम स्पर्धेचा थरार

बुधवारी लेझीम, पंजा लढवणे, रस्सी खेच, ढोलताशा, लंगडी, मल्लखांब, कबड्डी, मल्लयुद्ध या आठ खेळांमधील स्पर्धकांमध्ये महाअंतिम सामने रंगले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आणि संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (Krida Mahakumbh)

‘शिवसोहळा’ सादरीकरणाचा रोमांच

शिवशाहीर नंदेश उमप आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिव सोहळा’ हा कार्यक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कर्तृत्व यावर आधारित पोवाडे सादर केले. यामुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. (Krida Mahakumbh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.