IQOO Neo 9 : आयक्यूओओ निओ ९ फोनची पाहा पहिली झलक

याच आठवड्यात आयक्यू कंपनीचा नवीन निओ ९ फोन भारतात लाँच होतोय. 

323
IQOO Neo 9 : आयक्यूओओ निओ ९ फोनची पाहा पहिली झलक
  • ऋजुता लुकतुके

आयक्यू ओओ निओ ९ (IQOO Neo 9) फोन भारतात गुरुवारी लाँच होत आहे. हल्ली फोन बाजारपेठेत लाँच होतानाच तो ई-कॉमर्स साईटवरही उपलब्ध होतो. तसाच हा फोनही ॲमेझॉनवर उद्यापासून विकत घेता येणार आहे. आणि ॲमेझॉनने फोनची बरीचशी वैशिष्ट्य फोनबरोबर दिली आहेत. त्यामुळे आयक्यू कंपनीचा हा नवीन फोन नेमका कसा आहे हे समजतं. या फोनचं डिझाईन हे नाविन्यपूर्ण आहे. फोनचं कव्हर लेदरचं आहे. आणि कव्हरच्या एका बाजूला आहेत आयक्यूचे दोन कॅमेरे. (IQOO Neo 9)

फोनचा डिस्प्ले ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. डिस्प्लेची प्रखरता ३००० नीट्सची आहे. आणि फोनचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८व्या पिढीचा आहे. २०२३ च्या सगळ्या अत्याधुनिक फोनमध्ये हाच प्रोसेसर वापरलेला आहे. या फोनचं वैशिष्ट्य आहे ते दोन सक्षम कॅमेरे. यातला ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा हा सोनीचा आहे. तर आणखी एक वाईड अँगल कॅमेरा आहे. (IQOO Neo 9)

(हेही वाचा – Indian Military ने सिक्कीममध्ये वाचवले ५०० जणांचे प्राण; बर्फवृष्टीत अडकलेले पर्यटक)

फोनची बॅटरीही ५,१६० एमएचए क्षमतेची आहे. अधिकचे पैसे मोजून कंपनीने ग्राहकांना १२० वॅट्सचा फास्ट चार्जर देऊ केला आहे. तर नेहमीचा चार्जरही पॅकमध्ये असेल. गुरुवारी आयक्यू ओओ निओ आणि निओ प्रो अशा दोन व्हेरियंटमध्ये हा फोन उपलब्ध होईल. आणि हा फोन अगदी १ टेराबाईट क्षमतेपर्यंत उपलब्ध असेल. प्रो फोनची किंमत ही ३४,९९९ रुपये आहे. (IQOO Neo 9)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.