- ऋजुता लुकतुके
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत १४ स्थानांची झेप घेऊन १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या वीस फलंदाजांत स्थान मिळवण्याची ही त्याची पहिलीच खेप आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत सलग दोन द्विशतकं झळकावून त्याने ही मजल मारली आहे. जागतिक स्तरावर ही कामगिरी करणारा तो आठवा तर भारताचा तिसरा फलंदाज आहे. त्याच्या पूर्वी विराट कोहली आणि विनोद कांबळी यांनी सलग दोन डावांत द्विशतकं केली आहेत. (Yashaswi Jaiswal)
विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने (Yashaswi Jaiswal) २०९ धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर राजकोटमध्येही त्याने इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत नाबाद २१४ धावांची खेळी साकारली. याच खेळीदरम्यान एका डावात सर्वाधिक १२ षटकार खेचण्याच्या विक्रमाचीही त्याने बरोबरी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने राजकोटमध्ये इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. आणि मालिकेतही २-१ ने आघाडी घेतली आहे. (Yashaswi Jaiswal)
Sensational spinners gain big in the latest ICC Men’s Player Rankings 🤩
More ➡️ https://t.co/Sw4mYyR9Y5 pic.twitter.com/Q0VOizdEXR
— ICC (@ICC) February 21, 2024
(हेही वाचा – Sachin, Sachin! : सचिन तेंडुलकर प्रवास करत असलेल्या विमानात ‘सचिन, सचिन’चा नारा)
रवीचंद्रन अश्विन या क्रमांकावर
राजकोट कसोटीत शतक आणि पाच बळीही टिपणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. जडेजानेही मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आणि त्याच्या जोरावर ३४ व्या स्थानावर तो पोहोचला आहे. त्याची आधीची क्रमवारी ४१ वी होती. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत तर तो आता पहिल्या दहांत पोहोचला आहे. तर राजकोट कसोटीत ५०० बळींचा टप्पा पूर्ण करणारा रवीचंद्रन अश्विन आता जसप्रीत बुमराच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Yashaswi Jaiswal)
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा आणि अश्विन यांनी आपला अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक कायम राखला आहे. भारताकडून कसोटीत पदार्पण करणारे सर्फराझ आणि ध्रुव जुरेल यांनी पहिल्यांदाच क्रमवारीत शिरकाव केला आहे. आणि तो ही पहिल्या शंभरात. सर्फराझ ७५ तर जुरेल १०० व्या स्थानावर आहेत. (Yashaswi Jaiswal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community