मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने केलेला कायदा टिकणारा नाही, त्याला विरोध करत ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आठवडाभरासाठी आंदोलन ठरवले आहे. त्याची घोषणा करतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांचे साथीदार अजय महाराज बरासकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सरकारवरच आरोप केले आहेत. जरांगे पाटील याना थोपवण्यासाठी सरकारने आधी छगन भुजबळ यांना आणले आता बावसकर यांना आणले आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
जरणगेंनी तक्तीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असे दिसतंय.
आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे
जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 21, 2024
जरांगेंनी ताकदीने लढा (Maratha Reservation) दिला यात काहीच शंका नाही. पण, त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे दिसत आहे. आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे. जे जरांगे म्हणत आहेत, तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही. सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला. पण, शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती, असे म्हणत अंजली दमानिया यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. तसेच, अजय महाराज बारसकर यांना सरकारनेच उभं केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community