Google Releases Open AI : गुगलचं नवीन एआय मॉडेल मोफत उपलब्ध होणार

मेटानंतर गुगल कंपनीनेही आपलं एआय उत्पादन लोकांच्या वापरासाठी मोफत खुलं केलं आहे. 

222
Google Releases Open AI : गुगलचं नवीन एआय मॉडेल मोफत उपलब्ध होणार
  • ऋजुता लुकतुके

गुगल या अग्रगण्य टेक कंपनीने आपली काही नवीन एआय आधारित मॉडेल लोकांसाठी खुली केली आहेत. आणि ते करताना वापराच्या कुठल्याही मर्यादा नसल्यामुळे लोक ही मॉडेल स्वत:ची म्हणूनही वापरू शकतील. मेटा कंपनीही सध्या याच तत्त्वावर काम करत आहे. ‘ओपन मॉडेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मॉडेलचा वापर करून व्यक्ती किंवा संस्थाही आपले स्वत:चे प्रोग्राम बनवू शकतील. (Google Releases Open AI)

(हेही वाचा – Babar Azam : पाकचा बाबर आझम टी-२० प्रकारात १०,००० धावा सर्वात जलद पूर्ण करणारा फलंदाज)

गेमाचा वापर करून प्रोग्राम बनवणाऱ्या व्यक्तीला गुगलकडून मिळणार ‘इतके’ अमेरिकन डॉलर

गुगलचं एआय मॉडेल गुगल क्लाऊडवर उपलब्ध असेल. आणि एकाखा अभियंता ते वापरून आरामात आपला एखादा प्रोग्राम बनवू शकेल, जो पुन्हा गुगल क्लाऊडवरच उपलब्ध होईल. गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उत्पादनांना गेमा म्हटलं जातं. आणि अजून तरी ही उत्पादनं मोफत द्यायची की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आर्थिक मोबदल्यासाठी काही रणनीती बनवायची यावर गुगलचा विचार सुरू आहे. सध्या गुगल क्लाऊडवर पहिल्यांदा गेमाचा वापर करून प्रोग्राम बनवणाऱ्या व्यक्तीला ३०० अमेरिकन डॉलर गुगलकडून मिळणार आहेत. (Google Releases Open AI)

सध्या तरी कृत्रिम बुद्धिमत्ता हे कंपनीसाठी खुलं तंत्रज्ञान आहे. मेटा कंपनीनेही अगदी असाच प्रयोग केला आहे. गेमा लोकांच्या वापरासाठी खुलं असलं तरी जेमिनी हे उत्पादन अजून गुगलने खुलं केलेलं नाही. मेटाचा लामा २ हा प्लॅटफॉर्मही लोकांसाठी मोफत उपलब्ध आहे. गुगलच्या गेमा उपक्रमाचं टेक कंपन्यांनी स्वागत केलं असून चॅटबॉट सारखाच एक प्रोग्राम तयार करणार असल्याचं एनविडिया या जगप्रसिद्ध कंपनीने म्हटलं आहे. हा चॅटबॉट विंडोंजच्या संगणकांवर चालेल. (Google Releases Open AI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.