IPL Star in Trouble : एका मॉडेलची आत्महत्या, पोलीस करणार ‘या’ आयपीएल स्टारची चौकशी

मृत मॉडेलने मृत्यूपूर्वी शेवटचा संदेश या क्रिकेटरलाच लिहिला होता. 

286
IPL Star in Trouble : एका मॉडेलची आत्महत्या, पोलीस करणार ‘या’ आयपीएल स्टारची चौकशी
  • ऋजुता लुकतुके

मॉडेल तानिया सिंगच्या (Tania Singh) मृत्यूचा तपास करणारे पोलीस चौकशी दरम्यान आयपीएलमधील (IPL) एक खेळाडू अभिषेक शर्मापर्यंत (Abhishek Sharma) पोहोचले आहेत. ही मॉडेल आणि अभिषेक मित्र होते. आणि मॉडेलने अभिषेकला एक संदेशही पाठवला होता, हे पोलीस तपासात उघड झालं आहे. आता ते अभिषेकची चौकशी करण्याच्या विचारात आहेत. (IPL Star in Trouble)

मॉडेल तानिया सिंग (Tania Singh) ही सुरतमधील वेसु इथं असलेल्या तिच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या फोनवरून काही व्हॉट्सॲप संदेश अभिषेकला पाठवले गेले होते. शेवटच्या संदेशाला अभिषेकचं (Abhishek Sharma) काही उत्तर नव्हतं. (IPL Star in Trouble)

(हेही वाचा – Congress : काँग्रेसचा हिंदुद्वेष; कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू मंदिरांवर लावणार ‘झिजिया कर’)

अभिषेक शर्मावर प्रथमच आयपीएलसाठी बोली लावण्यात आली 

‘मृत मॉडेल आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांच्यात मैत्री होती एवढंच आम्हाला आतापर्यंत कळलं आहे. आता आम्ही मॉडेलचे फोन रेकॉर्ड्स तपासून पाहू. आणि त्याचा अभ्यास केल्यावरच आम्हाला तपासाची पुढील दिशा ठरवता येईल. अभिषेक वर्माला नोटीस पाठवली जाईल,’ असं या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपायुक्त एम आर मल्होत्रा मीडियाशी बोलताना म्हणाले. (IPL Star in Trouble)

मृत मॉडेल २८ वर्षांची होती. तर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) २३ वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो आधी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सध्या सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळतो. अचूक आणि वेगवान डावखुरा फिरकी मारा करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तसंच मधल्या फळीत धुवाधार फलंदाजीही तो करू शकतो. (IPL Star in Trouble)

२०१८ च्या हंगामात त्याच्यावर प्रथमच आयपीएलसाठी (IPL) बोली लागली. दिल्ली संघाने त्याला ५५ लाख रुपये देऊन विकत घेतलं होतं. त्याच हंगामात १९ चेंडूंत नाबाद ४६ धावा करत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर तो नियमितपणे सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतो. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. आणि टी-२० प्रकारात तर त्याने ८८ सामन्यांत २,१८७ धावा आणि ३० बळीही मिळवले आहेत. (IPL Star in Trouble)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.