Smita Thackeray : बाळासाहेब मला राज्यसभेवर पाठवणार होते; पण…; स्मिता ठाकरेंनी मुलाखतीमध्ये संवेदनशील विषयांवर केले भाष्य

331
बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते की ते मला राज्यसभेवर पाठवतील. माझे काम पाहून त्यांनी मला वचन दिले होते की, तुला राज्यसभेवर पाठवेन. पण तसे घडले नाही, कारण यामागे कोण होते हे मी सांगणार नाही. सगळ्यांना आतून माहीत होते  की मी राजकारणात यावे. काही गोष्टी अधोरेखित असतात, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील

शिवसेनेची जी काही अवस्था झाली आहे ती पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा एकमेकांपासून वेगळे होत होते तेव्हा मी त्या दोघांना थांबवण्याचा, समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही गोष्टी खूप खोलवर गेलेल्या असतात, ज्या मनात राहतात. तसेच अनेकदा काहींचे उद्देश असेच असतात की आम्हीच वारसदार आहोत. ही वृत्ती ज्याच्या डोक्यात आहे तोच स्वतःला वारसदार म्हणवतो. मग इतर लोकांचं महत्व त्यांना राहात नाही. अशा वृत्तीने कुणी चालणार असेल तर पक्ष एकसंध कसा राहिल?, असेही स्मिता ठाकरे  (Smita Thackeray) म्हणाल्या.

माझे आणि बाळासाहेबांचे नात गुरु शिष्याचे

माँ जेव्हा गेल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे खूप भावनिक झाले होते. मी तेव्हा त्यांच्याबरोबर होते. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काय झाले ते मला माहीत नाही. आम्ही (मी आणि बाळासाहेब) या विषयावर कधी बोललोही नाही. मी कायम त्यांच्याकडून जितके चांगले शिकता आले तेवढे मी शिकले. माझे आणि त्यांचे नात गुरु शिष्याचे आहे. मी आज जे काही शिकले आहे ते सगळे बाळासाहेबांमुळेच शिकले आहे, असेही स्मिता ठाकरे  (Smita Thackeray) म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.