- ऋजुता लुकतुके
आदित्य बिर्ला फॅशन्स कंपनीने डिझायनर तरुण तहिलियानी यांच्या सहकार्याने तस्वा (Tasva brand) हा ब्रँड बाजारात आणला आहे. या ब्रँडचं पाचवं स्टोअर मुंबईत ओबेरॉय मॉलमध्ये नुकतंच सुरू करण्यात आलं. आदित्य बिर्ला फॅशनच्या पोर्टफोलिओत लग्न समारंभ आणि विशेष प्रसंगी घालायच्या पारंपरिक पोशाखांच्या ब्रँडचीच कमी होती. ती कमी तरुण तहिलियानी यांच्या सहकार्याने कंपनीने भरून काढली आहे. सुरुवातीला फक्त मुंबईतच या ब्रँडचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. (Aditya Birla Tasva Store)
ब्रॅण्डचे नवीन स्टोअर १,७४६ चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि कुर्ते, बंदी, शेरवानी, बांधगला, आचकान, चुरीदार, अलिगढी आणि अॅक्सेसरीज जसे साफा, ब्रोचेस, पॉकेट स्क्वेअर, शाल, स्टोल, मोजडी या गोष्टी विक्रीसाठी आहेत. आणि ग्राहकांना त्यांची पसंती ठरवण्यासाठी दुकानातील प्रशिक्षित स्टाफही मदत करणार आहे. (Aditya Birla Tasva Store)
(हेही वाचा – J P Nadda : लोकसभेची लढाई ही मोठ्या फरकाने जागा निवडून आणण्यासाठी)
या कापडांचा वापर
तस्वा ब्रँडमध्ये रेशीम, बनारसी ब्रोकेड, मखमली व कॉटन अशा कापडाचा वापर झाला आहे. त्यामुळे भारताची परंपरा आणि संपन्न वारसा यातून दिसतो, असा दावा डिझायनर तरुण तहिलियानी यांनी केला आहे. पारंपारिक भरतकाम जसे जरदोजी, आरी, चिकनकारी आणि गोटा वर्कचा संपूर्ण कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. (Aditya Birla Tasva Store)
‘ब्रॅण्डला (Tasva brand) परिपूर्ण लुक देण्यासाठी आम्ही अथक मेहनत घेतली आहे. एथनिक वेअर वापरायला सुटसुटीत नसतात. आणि आरामदायी नसतात, अशी तरुणांची तक्रार असते. पण, आम्ही असे गारमेंट्स डिझाइन केले आहेत, जे पारंपरिक आहेत पण, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि त्यामुळे आरामदायी आहेत,’ असं या ब्रँडचे (Tasva brand) डिझायनर तरुण तहिलियनी मीडियाशी बोलताना म्हणाले. येत्या वर्षभरात सुरुवातीला मुंबईत आणि पुढे महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये २० दुकानांची चेन सुरू करण्याचा आदित्य बिर्ला कंपनीचा मानस आहे. (Aditya Birla Tasva Store)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community